अक्षय्य तृतीयेला दुर्मिळ योग! राशीनुसार करा ‘हे’ खास उपाय, मिळेल धन-समृद्धी…


पुणे : हिंदू धर्मात अक्षय्य तृतीया हा अत्यंत पवित्र आणि शुभ दिवस मानला जातो. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हा सण साजरा केला जातो. यंदा १९ एप्रिल २०२६ रोजी अक्षय्य तृतीया येत असून या दिवशी भगवान विष्णू, देवी लक्ष्मी आणि धनदेवता कुबेर यांच्या पूजेला विशेष महत्त्व आहे.

या दिवशी अनेकजण व्रत पाळतात तसेच शुभ कार्यांची सुरुवात करणे अत्यंत मंगल मानले जाते. धर्मशास्त्रानुसार अक्षय्य तृतीया हा दिवस संपत्ती, समृद्धी आणि यश मिळवण्यासाठी अत्यंत फलदायी मानला जातो.

या दिवशी केलेले दान, जप आणि पूजाविधी ‘अक्षय’ म्हणजेच न संपणारे फळ देतात, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे भक्त भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची विशेष पूजा करतात, तर आर्थिक प्रगतीसाठी कुबेराची आराधनाही केली जाते.

याशिवाय, उपवास करून पूजा केल्यास आयुष्यातील अडथळे दूर होतात, असे मानले जाते. नवीन व्यवसायाची सुरुवात, सोनं-चांदी खरेदी, गुंतवणूक किंवा इतर शुभ कार्यांसाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो.

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आपल्या राशीनुसार काही दान किंवा उपाय केल्यास विशेष लाभ मिळतो, अशी ज्योतिषशास्त्रातील मान्यता आहे. मेष राशीच्या व्यक्तींनी गहू दान करावेत आणि सायंकाळी तुळशीच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावावा.

वृषभ राशीच्या लोकांनी दुधापासून तयार केलेली मिठाई किंवा दूध दान केल्यास त्यांच्या कुंडलीतील चंद्र ग्रह मजबूत होतो. मिथुन राशीच्या लोकांसाठी हिरवे मूग दान करणे अत्यंत शुभ मानले जाते आणि यामुळे बुध ग्रहाची कृपा लाभते.

कर्क राशीच्या लोकांनी तांब्या भरून चणे आणि गूळ दान करणे लाभदायक मानले जाते, ज्यामुळे बृहस्पती ग्रह बळकट होतो. सिंह राशीच्या (Leo) व्यक्तींनी गरजू व्यक्तीला काळ्या रंगाची छत्री दान करावी, त्यामुळे ग्रहांची स्थिती अनुकूल राहते. कन्या राशीच्या लोकांनी एखाद्या ब्राह्मणाला किंवा गरजू व्यक्तींना खीर देऊन भोजन करणे पुण्यदायी मानले जाते. तूळ राशीच्या व्यक्तींनी चपला किंवा बूट दान केल्यास शुभ परिणाम मिळतात.

वृश्चिक राशीच्या लोकांनी धनदेवता कुबेराची पूजा करून केळी दान करावीत, ज्यामुळे गुरु ग्रहाची कृपा लाभते. धनु राशीच्या (Sagittarius) लोकांनी चण्याची डाळ दान केल्यास देवी लक्ष्मीची कृपा राहते.

मकर राशीच्या व्यक्तींनी कपडे किंवा धान्य दान केल्यास मनोकामना पूर्ण होण्यास मदत होते. कुंभ राशीच्या लोकांनी चणे किंवा गूळ दान केल्यास आर्थिक अडचणी कमी होतात, तर मीन राशीच्या लोकांनीही चणे किंवा गूळ दान केल्यास बृहस्पती देवाची कृपा लाभते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!