शेतकऱ्यांना मिळणार दरमहा 3000 रुपये ; PM किसान मानधन योजना काय आहे? अर्ज कसा कराल?


पुणे : केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत असते. यातील पंतप्रधान किसान मानधन योजना शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देते. या योजनेतून शेतकऱ्यांना दरमहा 3000 रुपयांचे निवृत्तीवेतन मिळते. म्हणजे वार्षिक 36 हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात.

याबाबत अधिक माहिती अशी की, पंतप्रधान किसान योजनेचा जे शेतकरी लाभ घेतात त्या शेतकऱ्यांनाच या मानधन योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेत वर्षाला 6000 रुपये दिले जातात. ही मदत तर मिळतेच. परंतु साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर पीएम किसान मानधन योजनेतुन दर महिन्याला 3000 रुपये मिळणार आहेत.म्हणजेच पीएम किसानचे 6000 आणि पीएम किसान मानधन योजनेचे वर्षभरात 36000 रुपये मिळणार आहेत.

या योजनेसाठी तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. जवळच्या सीएससी केंद्रात जाऊन अर्ज करायचा आहे. यानंतर शेतकऱ्यांना पेन्शन कार्डदेखील दिले जाते.त्यावरुन त्यांना लाभ मिळणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना मासिक हप्ता भरावा लागतो.हा हप्ता शेतकऱ्यांच्या वयानुसार 55 रुपये ते दोनशे रुपये इतका असतो. विशेष म्हणजे जितक्या कमी वेळात शेतकरी या योजनेत सामील होतात त्यांचा प्रीमियम कमी ठरू शकतो. शेतकऱ्यांनी भरलेल्या रकमेइतकी रक्कम केंद्र सरकार त्यांच्या खात्यात जमा करते. या योजनेतून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!