इराण – इस्त्राईलच्या युद्धामुळे पोटावर पाय!गॅस तुटवड्यानंतर कोळसाही महाग, किलोमागे ‘इतक्या’ रुपयांची वाढ

पुणे : गेल्या महिन्यापासून सुरू असलेल्या इराण- इस्त्राईलच्या युद्धाची झळ भारताला पोहचली आहे.या गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे त्रस्त झालेले लोक पर्यायी इंधन म्हणून चूल, इंडक्शन, इलेक्ट्रिक शेगडी आणि कोळशाकडे वळत आहेत. असे असतानाच आता बाजारपेठेत कोळशाच्या दरात तब्बल 1200 रुपयांची मोठी वाढ झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

आखाती देशांतील तणावामुळे एलपीजी पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. हॉटेल व्यावसायिकांनी आपले गॅस शेगड्यांचे बर्नर बंद करून कोळशाच्या भट्ट्यावर जेवण करण्यास सुरुवात केली. मात्र
आता कोळसा देखील महाग झाला आहे. बाजारपेठेत कोळशाच्या दरात तब्बल 1200 रुपयांची मोठी वाढ झाली असून, किरकोळ विक्रीमध्ये किलोमागे 12 ते 15 रुपयांची वाढ झाल्याची माहिती मिळाली आहे.
या युद्धामुळे अनेक वस्तूंच्या किमती ही महागल्या आहेत.घरगुती ग्राहकांसोबतच हॉटेल उद्योगाला याचा मोठा फटका बसला आहे. कोळसा महागल्याने तंदूर आणि भट्टीवर चालणाऱ्या पदार्थांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. याचा सर्वसामान्यांना फटका बसणार आहे.

दरम्यान मध्यमवर्गीय कुटुंबांनीही गॅस वाचवण्यासाठी कोळशाच्या छोट्या चुलींचा वापर सुरू केला आहे. मागणीत अचानक झालेल्या या प्रचंड वाढीमुळे बाजारपेठेत कोळशाचा तुटवडा निर्माण झाला असताना आता प्रचंड वाढ झाल्याने कोळसा घेणेदेखील परवडणासे झाले आहे.