बारामती पोटनिवडणुकीन राजकारण ढवळलं! पार्थ पवारांच्या’ त्या’ वक्तव्यावर सुप्रिया सुळेंनी कान टोचले, म्हणाल्या..


पुणे : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती पोटनिवडणुकीसाठी निवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीच्या चर्चेऐवजी वेगळ्याच कारणाने राजकारण ढवळून निघालं आहे.सुपुत्र पार्थ पवार यांनी काँग्रेसचा महाराष्ट्रात डाऊनफॉल होईल असं म्हटल्यानंतर तिथून वादाची ठिणगी पडली आहे. त्यावर आता सुप्रिया सुळे यांनी मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील नेत्यांची प्रतिक्रिया विचारा, कौटुंबिक सल्ला तर घरात दिला जातो असं म्हणत विषयच फिरवला.

अजित दादांचे ज्येष्ठ सुपुत्र पार्थ पवार असं म्हणाले होते की, दादांचा प्रेम होतं ते लोकांच्या हृदयात होत आणि आजही ते कायमच आहे.अशावेळी एवढ्या मॅच्युअर पक्षाने असा निर्णय घेणं म्हणजे…, जिथे एवढे मोठे नेते आहेत, अतिशय चुकीचं आहे. आम्ही सामोरं जाऊ, काही नशिबात लिहिलं आहे, ते होईल. फक्त मला वाईट वाटतंय की काँग्रेसचा महाराष्ट्रात डाऊनफॉल आहे. असं त्यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसने देखील बोचरी टीका केली आहे.

यावर सुप्रिया सुळे असं म्हणाल्या, पार्थ पवार यांच्या वक्तव्य विषयी मला विचारण्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट आहे त्या नेत्यांना विचारावा. त्यांच्या एका खासदाराचं मत आहे. तर ते त्यांच्या पक्षाचं मत असावं. हे मी बोलण्यापेक्षा त्यांच्या गटाने बोलणं जास्त योग्य आणि संयुक्तिक उत्तर मिळेल. राजकारणात परिपक्वता लागते असं शरद पवार म्हणाले होते. पार्थ पवार यांच्यात ती आहे की नाही हे मला माहिती नाही, असे स्पष्ट त्या म्हणाल्या.

दरम्यान पार्थ पवार यांनी कोणत्याही प्रकारचं भाष्य करताना जबाबदारीने आणि तर्कसंग करायला हवं असा एक सल्ला नकळत सुप्रिया सुळे यांनी दिला. मुळात त्यासाठी परिपक्वता लागते असं म्हणत त्यांनी पार्थ यांचे कान टोचले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!