‘झुकती है दुनिया, बस झुकानेवाला चाहिए’ ; अशोक खरातच्या काळ्या कारनाम्याच गुपित उघडलं, महिलांना कसं भुलवायचा?

पुणे : भोंदूगिरीच्या नावाखाली महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरातने एसआयटीच्या चौकशीत अखेर तोंड उघडलं आहे. त्याने महिलांवर अत्याचार कसा केला याची कबुली दिली आहे. ‘झुकती है दुनिया, बस झुकानेवाला चाहिए’ खरातच्या या वाक्याने त्याचा माज विचार करायला लावणारा आहे. चमत्कार आणि वशीकरणाच्या नावाखाली त्याने महिलांचे शोषण केल्याची कबुली त्यांनी दिली आहे.

भोंदू खरातने पीडित महिलांना मानसिक दबावाखाली आणून त्यांच्यावर वर्चस्व निर्माण केलं. ज्या गोष्टींना लोक चमत्कार अथवा वशीकरण समजतात, तेच हातचलाखीने केल्याचं त्याने मान्य केलं. लोकांच्या मानसिकतेचा अभ्यास करून आणि विज्ञानातील काही ट्रिक्स वापरून त्याने महिलांना भुलवल्याची कबुली देखील दिली आहे. त्यामुळे आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करणाऱ्या खरातने स्वत:च कथित दैवी शक्तीमागचं पितळ चौकशीत उघड पाडलं आहे.
भोंदूगिरीच्या नावाखाली महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरातने महिलांवर अत्याचार कसा केला याची कबुली दिली आहे. मात्र या अत्याचाराला त्याने विज्ञानाला जोडण्याचा प्रयत्न केला. महिलांना धमकावून आणि हातचलाखीने त्यांना आकर्षित करून शोषण केल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं आहे

दरम्यान कोठडीत असूनही खरातचा माज कायमच असल्याचे स्पष्ट झाला आहे.. ‘दुनिया झुकती है, बस झुकानेवाला चाहिए’ असं देखील तो कबुली जबाबात बोलल्याची माहिती समोर आली आहे. तसेच आपण महिलांना कसं भुलवायचो, हेही सांगितलं आहे. अशोक खरातच्या या कबुलीमुळे या प्रकरणाला नवं वळण लागलं आहे.
दरम्यान चौकशीत अशोक खरातने हा कबुली जबाब दिल्यानंतर त्याची विकृत मानसिकता समोर आली आहे. या घृणास्पद कृत्यात त्याला आणखी कुणाची मदत होत होती का? यात आणखी कोण कोण सहभागी आहे? या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत.