गॅस ग्राहकांसाठी मोठी अपडेट! १ जुलै ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही गॅस सिलिंडर, जाणून घ्या संपूर्ण माहिती…


पुणे : एलपीजी सिलिंडरच्या उपलब्धतेवर वाढत्या ताणाच्या पार्श्वभूमीवर सरकारने गॅस कनेक्शनसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नव्या धोरणानुसार, पाइपद्वारे नैसर्गिक वायू (PNG) वापरणाऱ्या ग्राहकांना लवकरच एलपीजी सिलिंडरचा पुरवठा बंद करण्याची तयारी सुरू आहे.

या निर्णयामुळे दुहेरी गॅस कनेक्शन  असलेल्या हजारो ग्राहकांवर थेट परिणाम होणार असून त्यांना आता एकाच पर्यायावर अवलंबून राहावे लागणार आहे. त्यामुळे ग्राहकांसमोर मोठा बदल उभा राहणार आहे.

दरम्यान, पुरवठा विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार पीएनजी आणि एलपीजी दोन्ही कनेक्शन असलेल्या ग्राहकांवर कारवाई करण्यात येणार आहे. ग्रीन गॅस लिमिटेड कडून अशा ग्राहकांची यादी मागवण्यात आली असून पुढील काही महिन्यांत या सर्व कनेक्शनची तपासणी केली जाणार आहे. नव्या नियमांनुसार एकाच घरात दोन्ही प्रकारचे गॅस कनेक्शन ठेवण्यास परवानगी दिली जाणार नाही.

जिल्हा पुरवठा अधिकारी आनंद कुमार यांनी सांगितले की, सध्या पीएनजी वापरणाऱ्या सुमारे ७० हजार ग्राहकांना त्यांचे एलपीजी कनेक्शन परत करावे लागणार आहेत. १ जुलैपासून या ग्राहकांच्या घरांपर्यंत एलपीजी सिलिंडरचा पुरवठा बंद केला जाईल.

केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने या संदर्भात आदेश जारी केला असून त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यांत हा निर्णय टप्प्याटप्प्याने लागू केला जाणार आहे.

ज्या परिसरांमध्ये आधीच पीएनजी पाइपलाइन उपलब्ध आहे, त्या भागातील नागरिकांना केवळ पीएनजी कनेक्शनचा वापर करावा लागणार आहे. घरापासून सुमारे ३०० मीटरच्या अंतरात पाइपलाइन असल्यास ग्राहकांना एका आठवड्यात कनेक्शन उपलब्ध करून दिले जाईल. यासाठी अर्ज करताना सुमारे ६००० रुपयांची सुरक्षा ठेव भरावी लागेल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!