बारामतीकर आक्रमक, पटेल, तटकरे यांच्या विरोधात फलक, आम्हाला फक्त दादाच नाव पुरेसे, पोस्टरची राज्यात चर्चा…


बारामती : बारामतीत पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापल्याचे स्पष्ट चित्र दिसू लागले आहे. प्रशासकीय भवन परिसरात अचानक झळकलेल्या फलकांमुळे नव्या वादाची ठिणगी पडली असून, त्यामुळे परिसरात चर्चांना आणि राजकीय हालचालींना वेग आला आहे.

या फलकांमागे दादासमर्थकांचा हात असल्याची जोरदार चर्चा रंगत आहे. या माध्यमातून काही विशिष्ट नेत्यांविरोधात उघड नाराजी व्यक्त करण्यात आल्याचेही बोलले जात आहे.

“फक्त अजितदादांचे नावच पुरेसे आहे, घातकी तटकरे-पटेलची गरज नाही – समस्त दादा प्रेमी,” असा ठळक आणि आक्रमक संदेश या फलकांवर झळकत असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पार्श्वभूमीवरच हे फलक झळकले असल्याने बारामतीतील राजकीय हालचालींना वेग आला आहे. एकीकडे समर्थकांचा वाढता उत्साह दिसत असताना, दुसरीकडे अशा आक्रमक फलकांमुळे वातावरण अधिकच तापले आहे. यावर संबंधित नेते आणि पक्षांकडून नेमकी काय भूमिका घेतली जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!