खरात प्रकरणात मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा!’त्या ‘सीडीआरची चौकशी होणार, लीक कोणी केला? समोर येणार….


पुणे: नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर येत असताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अशोक खरात यांच्यात 17 वेळा फोन कॉल्स झाल्याचा दावा केला आहे. आपण सीडीआरच्या आधारे हा खुलासा केला अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे. मात्र आता याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा करत त्या सीडीआरची चौकशी होणार असल्याच स्पष्ट केल आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,अशा पद्धतीने सीडीआर प्राप्त करून घेण्याचा कोणालाही अधिकार नाही. तो अधिकार फक्त जी संबंधित तपास यंत्रणा आहे, त्यांनाच तो अधिकार आहे. त्यामुळे हा सीडीआर कशापद्धतीने लीक झाला? तो कुणी लीक केला? या संदर्भातील चौकशी राज्य सरकार करेल. मला वाटतं अशा सेंसेटिव्ह केसमध्ये आरोप प्रत्यारोप करून चालत नाही. ज्याच्याविरोधात सबळ पुरावा असेल त्यांच्याविरोधात कारवाई होईल, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान अशोक खरात प्रकरणात अनेक राजकीय नेत्यांचे कनेक्शन उघड होत असल्यामुळे या काळ्या कारनाम्यात आणखीन कोणाचा समावेश आहे हे देखील शोधले जात आहे.तसेच खरातच्या संपत्तीचा पूर्ण तपास आम्ही करणार आहोत, त्याने जे वेगवेगळे अकाऊंट उघडले आहेत, ते आमच्या लक्षात आले आहेत, त्याचे वेगवेगळे ट्राझेक्शन देखील आमच्या लक्षात आले आहेत. आणि आता या प्रकरणात लोक स्वत:हून समोर येऊन माहिती देत आहेत, त्यामुळे एसआयटीला देखील मोठ्या प्रमाणात माहिती प्राप्त झाली आहे.

त्यामुळे या प्रकरणाची सर्व मुळे आम्ही खोदून काढू. मला वाटतं एसआयटी योग्य पद्धतीने काम करत आहे, सर्वांनी एसआयटीवर विश्वास ठेवावा, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!