खरात प्रकरणात ट्विस्ट! बायकोनंतर आता पोलिसांच्या हातावर तुरी देऊन मुलगाही फरार, तपास यंत्रणेवर प्रश्नचिन्ह


पुणे : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत असताना या प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. भोंदू बाबाची पत्नी कल्पना खरात मागच्या अनेक दिवसांपासून फरार असून तिच्या मागावर पोलीस आहेत.असे असतानाच आता मुलगा हर्षवर्धन देखील फरार झाला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे तपास यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

भोंदूबाबाच्या काळ्या कारनाम्याची एसआयटी तपासामार्फत रोज नवनवीन यादी समोर येत आहे. दोन दिवसांपूर्वी खरातचा मुलगा हर्षवर्धन खरातला SIT ने ताब्यात घेतले होते. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली होती. मात्र या चौकशी दरम्यान हर्षवर्धनने बऱ्याचा प्रश्नांची उत्तरे देण्यास टाळाटाळ केली. यानंतर त्याला सोडून देण्यात आले होते. मात्र तो आता फरार झाल्याने खळबळ उडाली आहे.

हर्षवर्धन खरात याची चौकशी सुरू असल्याने त्याने शहर सोडण्यापूर्वी पोलीस अधिकाऱ्यांची परवानगी घेणे अनिवार्य आहे. मात्र कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेचे पालन न करताच तो गायब झाला का?की दुसरी कुठले कारण आहे अशी शंका आता उपस्थित केली जात आहे.पत्नी नंतर मुलगा हर्षवर्धन खरातही फरार झाला असून मोबाईल नॉट रिचेबल असल्याने SIT तपासावर प्रश्नचिन्ह केले जात आहे.

दरम्यान हर्षवर्धन खरातचा मोबाईल बंद असल्याने पोलिसांनी खरातच्या निवासस्थानी शोध घेतला असता मुलगा तेथे सापडला नाही. त्यामुळे हर्षवर्धन खरात चौकशी टाळण्यासाठी गायब झाला का? अशा चर्चा सुरू आहे

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!