बैलगाडा शर्यतीवेळी थरारक घटना! कोल्हापूरमध्ये अनेक मोटारसायकल आडव्या करत बैलांनी लोकांना चिरडले, अनेकजण जखमी..


कोल्हापूर : बैलगाडा शैर्यत म्हणजे अनेकांच्या आवडीचा जिव्हाळ्याचा विषय. मात्र अनेकदा यातून थरारक घटना घडल्याचे अनेकदा समोर आले आहे. आता अशीच एक घटना कोल्हापूर जिल्हातून समोर आली आहे. गडहिंग्लज तालुक्यातील औरनाळ येथे बैलगाडी शर्यतीवेळी एक थरारक आणि जीवाचा थरकाप उडवणारी घटना घडली.

या घटनेने एकच खळबळ उडाली. यामध्ये अनेकजण जखमी झाल्याचे समोर आले आहे. शर्यत सुरु असताना चौखूर उधळलेल्या बैलांच्या मार्गात एक मोटारसायकल आली. मात्र, प्रचंड वेगात असलेल्या अचानक बैलांना थांबता आले नाही. त्यामुळे या बैलांनी हवेत उंच उडी मारली. यामुळे मोठी पळापळ झाली.

हे बैल आणि गाडा मोटारसायकल चालकांच्या अंगावर पडला. यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शर्यतीमधील या अपघातामध्ये तिघेजण जखमी झाले आहेत. तसेच अनेक गाड्यांचे यामध्ये मोठे नुकसान झाले आहे. यामुळे याबाबत खबरदारी घेणे गरजेचे झाले आहे. शर्यत सुरु असताना चौखूर उधळलेल्या बैलांच्या मार्गात एक मोटारसायकल आली.

हा प्रसंग पाहणाऱ्यांच्या अंगावरही अक्षरश: काटा आला. बैलगाडीच्या पुढे मोटरसायकल लावणाऱ्या तरुणांच्या जीवावर बेतणाऱ्या या प्रसंगाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली. यामध्ये अनेकजण जखमी झाल्याचे समोर आले आहे. सध्या अनेक गावात यात्रा सुरू आहे. यानिमित्त अनेक कार्यक्रम घेतले जात आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!