अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वादळ! निवडणूक आयोगाला दिलेलं अंतर्गत पत्र बाहेर कसं आलं? चौकशी होणार..

मुंबई : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत धुसफूस सुरू असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. अशातचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रांवरून नव वादंग सुरू झाल आहे.आता राष्ट्रवादी पक्षाचे निवडणूक आयोगाला दिलेले अंतर्गत पत्र हे बाहेर आले कसे? याची आता कसून चौकशी केली जाणार आहे.

आमदार रोहीत पवार यांना 10 मार्च 2026 ला निवडणूक आयोगाला दिलेले पत्र कोणी दिले याची चौकशी केली जाणार आहे. या आधीच कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना बोलावून झाडाझडती घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.निवडणूक आयोगाला देण्यात आलेल्या या पत्रांवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेदाची चर्चा सुरू झाली. आता ही मतभेदांची दरी रुंदावणार का याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात केवळ अध्यक्ष म्हणून स्वत:च्या नावाचा तर कोषाध्यक्ष म्हणून शिवाजीराव गर्जे यांच्या नावाचा समावेश आहे.. विशेष म्हणजे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंच्या नावापुढे पदाचा मात्र उल्लेख नाही. या पत्रानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

मात्र या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्या पत्रावरून राष्ट्रवादीत वादळ आलंय ते निवडणूक आयोगाला पाठवलेलं हे पत्र कसं बाहेर आलं? याबाबतची चौकशी सुरू असून यातून आणखीन काय माहिती पुढे येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.