चाकणकर वादाच्या भोवऱ्यात! अशोक खरातला तब्बल 177 कॉल, एकनाथ शिंदेंसोबतही झालं बोलणं ; अंजली दमानियांचे गंभीर आरोप


पुणे :नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या कारन्याम्याचे धक्कादायक पत्ते उलगडले जात आहेत.त्यानंतर आता अशोक खरातचा सीडीआर समोर आला आहे. मागील वर्षभरात अशोक खरातने कुणाला कॉल केले? त्याला कुणी कॉल केले? तो कुणाशी किती वेळा आणि किती काळ बोलला? याचा सगळा तपशील समोर आला आहे. यातून चाकणकर वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपानुसार, मागील वर्षभरात रुपाली चाकणकर यांनी अशोक खरातला तब्बल 177 वेळा कॉल केला आहे. अशोक खरातची मुलगी तृप्तबाला खरात हिच्यानंतर सर्वाधिक कॉल हे रुपाली चाकणकर यांनी केल्याचं सीडीआरमधून स्पष्ट होत आहे. दोघांमध्ये तब्बल 33,727 सेकंद बोलणं झाल्याचा दावा दमानिया यांनी केला आहे.

अंजली दमानिया यांच्या दाव्यानुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दीपक केसरकर, चंद्रकांत पाटील, सुनील तटकरे आणि आशिष शेलार यांनी देखील अशोक खरातशी संपर्क साधला आहे. मागील वर्षभरात एकनाथ शिंदे यांनी अशोक खरातला 17 कॉल केले होते. यात 10 कॉल इनकमिंग तर 7 कॉल आऊट गोइंग होते, असा दावा दमानिया यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे खरातशी राजकीय नेत्यांचे कनेक्शन उघड होत आहेत.

दरम्यान अशोक खरातचा हा कथित सीडीआर समोर आल्यामुळे आता या प्रकरणात विविध चर्चांना उधाण आलं आहे. अंजली दमानिया यांनी व्हिडीओ जारी करत सीडीआरबाबत विविध दावे केले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाला नवीन वळण मिळताना दिसत आहे. अंजली दमानिया यांच्या दाव्यावर अद्याप संबंधित नेत्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!