बारामती पोटनिवडणुकीत ठाकरे गटाची एन्ट्री, संजय राऊत यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण, म्हणाले, निवडणूक लढण्यास विरोध…


बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. यामुळे अनेकांना मोठा धक्का बसला. अचानक झालेल्या या घटनेमुळे राजकारणात अनेक बदल झाले. असे असताना आता बारामतीची पोट निवडणुक लागली आहे. महाविकास आघाडीत ही जागा शरद पवार गटाकडे आहे. मात्र पवार गटाने निवडणूक लढणार नसल्याचे सांगितले.

असे असताना आता काँग्रेसने बारामती पोटनिवडणूक लढवण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. त्याला ठाकरे गटानेही समर्थन दिलं आहे. खासदार संजय राऊत यांनी राहुरी आणि बारामती विधानसभा पोटनिवडणुकीवर भाष्य केलं. महाविकास आघाडी म्हणून दोन्ही निवडणुका लढण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.

या निवडणुकीवरून ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शरद पवार गटाला कानपिचक्याही दिल्या आहेत. त्यामुळे आघाडीत बारामतीवरून वाद असल्याचं समोर आले आहे. बारामतीच्या जागेवर शरद पवार गटाचा अधिकार आहे. या संदर्भात त्यांच्याशी आमची चर्चा होईल. या जागेबाबत आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ, असेही ते म्हणाले.

तसेच ते म्हणाले, अजित पवार यांच्या मृत्यूमुळे बारामती विधानसभेची निडवणूक होत आहे. कौटुंबिक धर्म म्हणून शरद पवारांचा पक्ष कदाचित ही निवडणूक लढणार नाही. इतर लढतील तर त्यांना विरोधी करता कामा नये. कारण शेवटी लोकशाही आहे. एकत्र बसून निर्णय घ्यावा लागेल. हे सरकार असंवेदनशील आहे. सरकारमधील मंत्र्यांच्या संवेदना ठार झालेल्या आहेत, अशी टीका राऊत यांनी केली.

दरम्यान, शेती उद्ध्वस्त झाली आहे. अन्य पिकांचे नुकसान झाले आहे. फार मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. पालकमंत्री अथवा सरकारकडून शेतकऱ्यांपर्यंत संवेदना व्यक्त केली जात नाही. आमदार, मंत्र्यांकडून सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केली गेली पाहिजे. पण या मदतीसाठी आमदार आणि मंत्री पावले उचलताना दिसत नाही, असेही ते म्हणाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!