राज्यात अवकाळी पावसाचा कहर! 5345 हेक्टर शेती बाधित, 77 जनावरे दगावली, 5 जणांचा मृत्यू..


पुणे : गेल्या दोन दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच गारपिटीमुळे मराठवाड्यातील पाच हजार ३४५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांसह फळबागांना फटका बसला आहे. यात सर्वाधिक म्हणजे ३ हजार ३४० हेक्टरवरील नुकसान एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झाले आहे.

यामुळे काढणीला आलेली पिके जमीनदोस्त झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. छत्रपती संभाजीनगर, बीड, जालनासह अन्य काही भागांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यात अनेक भागांत गारपीटदेखील झाली. वीज पडून जालना येथील दोघांचा आणि बीड येथील दोघांचा मृत्यू झाला.

जालना जिल्ह्यातील एक जण जखमी आहे. विभागात एकूण ७७ जनावरे मृत्युमुखी पडली. या विभागातील ११ हजार ५७२ हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली. यात ६ हजार ९४४ हेक्टरवरील बागायत क्षेत्रास; तसेच १ हजार २२९ हेक्टरवरील फळपिकांनादेखील फटका बसला आहे. बाधित गावांची संख्या ५३३ आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या २० हजार ८९६च्या आहे.

नुकसानीमध्ये १ हजार ९४७ हेक्टर जिरायत, दोन हजार ११२ बागायती आणि एक हजार २८५ हेक्टर फळबाग क्षेत्राचा समावेश आहे. यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे तीन हजार ३४० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. आधीच अडचणीत असलेला शेतकरी या नैसर्गिक आपत्तीमुळे अधिक अडचणीत सापडला आहे.

यानंतर नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पुणे शहरात काल सलग दोन तास जोरदार बरसणाऱ्या वादळी पावसामुळे मध्यवर्ती पुण्यासह उपनगरांतील रस्ते जलमय झाले होते. दुपारी दोन ते चार या वेळेत शिवाजीनगर येथे ६५, तर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी परिसरात ८४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!