शिंदे गटाला मोठा धक्का! दोन नेत्यांचा तडकाफडकी राजीनामा, नव्या पक्षात केला प्रवेश..


पुणे: गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. ऑपरेशन टायगर अंतर्गत पक्षांतर्गत राजकारण सुरू असून स्थानिक पातळीवरील नेते मंडळी आपल्या सोईनुसार पक्षप्रवेश करत आहे. अशातच आता शिंदे गटाच्या धाराशिवमधील दोन नेत्यांनी अचानक तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यामुळे शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार,धाराशिव जिल्ह्यातील नाभिक सेनेचे खजिनदार अनिल शिंदे आणि मागासवर्गीय सेलचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब समुद्रे यांनी स्वराज्य शक्ती सेनामध्ये पक्ष प्रवेश केला. दोघांचा पक्षप्रवेश स्वराज्य शक्ती सेना पक्षाच्या अध्यक्षा करुणा मुंडे यांच्या हस्ते झाला आहे.दरम्यान, आता धाराशीव जिल्ह्यातील दोन स्थानिक नेत्यांनी करुणा मुंडे यांच्या पक्षात प्रवेश केल्याने त्यांच्या पक्षाला विस्तार करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळेच भविष्यात नेमकं काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

या पक्षप्रवेशानंतर करुणा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की शिवसेना शिंदे गटात त्या दोघांनाही न्याय मिळत नव्हता. त्यांना त्यांच्या नेत्याला भेटता येत नव्हते. त्यामुळे संतप्त होऊन ते आज आमच्या पक्षात सामील झाले आहेत. या बड्या नेत्यांच्या पक्ष प्रवेशामुळे शिंदे गटाची ताकद आता कमी झाली आहे.

दरम्यान, करुणा मुंडे यांचा स्वराज्य शक्ती सेना या पक्षाची नोंदणी निवडणूक आयोगाकडे 12 जानेवारी 2024 रोजी करण्यात आली होती. या पक्षाचे कार्यालय मुंबईतील सांताक्रुझ येथे आहे. या पक्षाचे एक कार्यालय बीड जिल्ह्यातही आहे. या पक्षाच्या विस्तारासाठी आता करुणा मुंडे यांनी जोरदार कंबर कसली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!