लाडक्या बहिणींमुळे सरकारवर तब्बल 21300कोटींचे कर्ज; ‘या’ अपात्र महिलांवर कारवाई होणार?


पुणे : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सरकारने मोठ्या दणक्यात सुरू केली होती. या योजनेच्या लाभार्थ्याबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या योजनेचा अनेक अपात्र लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे. अपात्र लाडक्या बहिणींमुळे सरकारवर तब्बल 21300 कोटींचा आर्थिक भार पडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे 20 महिने 1500 रुपयेचा लाभ या अपात्र महिलांनी घेतला आहे.

लाडकी बहीण योजनेतून जवळपास 72 लाख महिला अपात्र असल्याची माहिती समोर आली आहे. सुरुवातीला या योजनेच्या 2.4 कोटी लाभार्थी महिला होत्या. त्यानंतर आता या महिलांची संख्या 1 कोटी 75 लाख झाली आहे. लाखो महिला अपात्र असतानाही त्यांनी योजनेचा लाभ घेतला आहे. दर महिन्याला 1500 रुपये घेतले आहेत. यासाठी सरकारने कोट्यवधी रुपयांचा खर्च केला आहे.

अपात्र महिलांनी गेल्या 20 महिन्यांपासून पंधराशे रुपये चा लाभ घेतल्याने सरकारवर मोठा आर्थिक भार पडला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर 2024 पासून अपात्र महिलांना 1.065 कोटी रुपये दिले आहेत. यामुळे सरकारवर 21300 कोटींचा आर्थिक भार पडला आहे.

महायुती सरकारने जुलै 2024 मध्ये योजना सुरु केली होती. या योजनेत लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1500रुपये दिले जातात. या योजनेसाठी काही निकष ठरवण्यात आले आहे. या निकषात पात्र असणाऱ्या महिलांनाच योजनेचा लाभ सुरु ठेवण्यात आला आहे. पडताळणीमध्ये अपात्र महिलांची माहिती समोर आली. तेव्हापासून त्यांचा लाभ बंद झाला आहे. या अपात्र महिलांवर आता सरकार काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!