पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी अंकिता पाटील तर समाजकल्याण सभापदी जितेंद्र बडेकर..

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापतीपदी आज इंदापूर तालुक्यातील माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या आणि बावडा लुमेवाडी जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांची आज वर्णी लागली तर उरुळीकांचन -सोरतापवाडी जिल्हा परिषद गटातून जितेंद्र बडेकर यांची समाजकल्याण समितीचे सभापतीपदी निवड करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व राज्यसभेचे खासदार पार्थ पवार यांनी जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापतीपदी धक्कादायक निवडी केल्या असून तरुण पदाधिकाऱ्यांना संधी देण्याचा पक्षाने संदेश दिला आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात असलेल्या व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या असलेल्या अंकिता पाटील यांना जिल्हा परिषदेत सामावून घेतल्याने राष्ट्रवादीतून एकोप्याचा संदेश दिला काय असा निवडीनंतर सूर उमटू लागला आहे.

जिल्ह्यात पार्थ पर्व झाले सुरु….
अंकिता पाटील व जितेंद्र बडेकर यांच्या निवडीने जिल्ह्यात पार्थ पवार सुरू झाले काय चर्चा सुरू झाली आहे. अंकिता पाटील यांच्याशी विद्यार्थीदशेत ते एकत्र होते. तर जितेंद्र बडेकर यांच्याशी त्यांचा मागासवर्गीय समाजातील प्रतिनिधित्व म्हणून ते जवळचे समर्थक म्हणून चर्चेत होते.