खुशखबर! सोनं झालं स्वस्त; 10 तोळ्यामागे 15,300 रुपयांची घसरण; 22 अन् 24 कॅरेटचे दर किती?

पुणे : इराण आणि अमेरिका युद्ध सुरू झाल्यापासून सोने आणि चांदीचे भावात सातत्याने चढ उतार होत आहेत.काल सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली असताना आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरात चांगलीच घसरण झाली आहे. आज 24 कॅरेट सोन्याचे दर 1530 रुपयांनी घसरले आहेत.ऐन लग्नसराईत सोन्याचे दर घसरल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे

आज 24 कॅरेट सोन्याचे दर 1530 रुपयांनी घसरले आहेत. हे दर1,51,520 रुपये झाले आहेत. 8 ग्रॅममागे सोनं 1224 रुपयांनी स्वस्त झाल असून हे दर1,21,136 रुपये झाले आहेत. 10 तोळ्यामागे सोन्याचे दर 15,300 रुपयांनी घसरले आहेत. हे दर 15,14,200 रुपये झाले आहेत.
आज 22 कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे 1400 रुपयांनी घसरले आहेत. हे दर 1,38,800 रुपये झाले आहेत. 8 ग्रॅममागे सोन्याचे दर 1,120रुपयांनी घसरले असून 1,11,040 रुपये झाले आहेत. 10 तोळ्यामागे 14000 रुपयांची घसरण झाली आहे. हे दर 13,88,000 रुपये झाले आहेत.

आज 18 कॅरेट सोन्याचे दर 1140 रुपयांनी घसरले आहेत. हे दर 1,13,570रुपये झाले आहेत. 8 ग्रॅममागे सोन्याचे दर 912 रुपयांनी घसरले असून 90,856 रुपये झाले आहेत. 10 तोळ्यामागे सोन्याचे दर 11,400 रुपयांनी घसरले असून 11,35,700 रुपये झाले आहेत