चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर फार्महाऊसवर ‘जंगी पार्टी ‘? एका सदस्याच्या स्टेटसमुळे फुटलं बिगं!

पुणे : नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्षपद आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर पाणी सोडावं लागलं आहे. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर पुण्यातील फार्महाऊसवर झालेल्या एका जंगी पार्टीची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत विरोधक कोण? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

खरात प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुपाली चाकणकरांना आदेश दिला होता. त्यानंतर चाकणकरांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे राजीनामा सूपुर्त केला होता.त्यांच्या राजीनाम्याची बातमी पसरताच काही जणांनी मुळशी तालुक्यातील एका फार्महाऊसमध्ये सदस्यांनी गॉगल लावून जल्लोष केला होता, त्या सेलिब्रेशनचे स्टेटस् एका सदस्यांने ठेवल्याने या पार्टींचे बिंग फुटले.
या पार्टीत सहभागी असलेल्या एका सदस्याच्या ‘स्टेटस’मुळे हा प्रकार बाहेर आला आहे.चाकणकरांच्या राजीनामा पार्टीत कोण सहभागी होते, याबाबत चर्चांना उधाण आले आहे. या पार्टीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत विरोधक कोण आहेत, याबाबत चर्चा सुरु आहे. या पार्टीमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.

दरम्यान नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याची पोलिस कोठडी संपली असता त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. उद्याही दुसऱ्या गुन्ह्याच्या संदर्भात त्याला न्यायालयात हजर करावं लागणार आहे,याकडेही सर्वांचे लक्ष लागलं आहे.