तटकरेंच्या पोस्टरवर अजितदादांचा फोटो गायब, टीकेनंतर आदिती तटकरे म्हणाल्या, चुकीबद्दल आमचे कान पकडण्याचा…


रायगड : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याने राष्ट्रवादीत अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. असे असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रायगड येथील एका कार्यक्रमातील पोस्टरवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटो नसल्याचे समोर आले.

यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री अदिती तटकरे यांच्यावर जोरदार टीका करण्यात यवत आहे. अनेकांनी या प्रकरणावर टीका केली आहे. यांनतर अदिती तटकरे यांनी दिलगिरी व्यक्त केली. बॅनरवरील फोटोवरून आमची निष्ठा ठरवू नये, असे त्या म्हणाल्या. याबाबत माहिती अशी की, रायगड मतदारसंघातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सदस्यांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमासाठीच्या बॅनरवर केवळ सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील सदस्यांचे फोटो होते. या बॅनरवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह दिवगंत नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटो नव्हते. त्यामुळे विरोधकांसह राष्ट्रवादीच्या इतर काही पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणी तटकरे कुटुंबीयांवर जोरदार टीका केली. यामुळे वातावरण तापले होते.

यामुळे रविवारी रात्री उशिरा अदिती यांनी एक्सवर दिलगिरी व्यक्त करत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. स्थानिक पातळीवर पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून कार्यक्रम घेतले जातात, असे अनेक कार्यक्रम दिवसभरात होत असतात. अशाच एका ग्रामपंचायत पातळीवरील कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपले दिवंगत नेते अजितदादा पवार आणि राष्ट्रीय अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राकाकी यांचा फोटो नव्हता, याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते.

अजितदादा असतील, सुनेत्राकाकी असतील यांचं आमच्या मनातील स्थान अढळ आहे. बॅनरवरील फोटोतून आम्हा सगळ्याच कार्यकर्त्यांची निष्ठा ठरवू नये. तरी, यानिमित्ताने एक बरे झाले- स्थानिक कार्यक्रमातील स्थानिक पातळीवर घडलेल्या एका चुकीचा मुद्दा बनवणारी यंत्रणा कशी काम करते हे आमच्या लक्षात आले.

हा मुद्दा चवीने चघळणाऱ्यांना दादा हयात असताना त्यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल मनातून किती पश्चाताप व्यक्त करावा लागत असेल देव जाणे..! बाकी काकींना पक्षाच्या कुटुंबप्रमुख म्हणून आमच्या चुकीबद्दल आमचे कान पकडण्याचा अधिकार आहेच. असे ट्विट त्यांनी केले आहे. येणाऱ्या काळात याबाबत काय घडणार हे बघणे महत्वाचे असणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!