प्रियकराला शेवटचा व्हिडिओ काॅल ठरला अखेरचा ; नर्सिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या तरुणीनं आयुष्य संपवल..


पुणे : नागपूर जिल्ह्यातील नर्सिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या,तरुणीनं आपल्या राहत्या घरात गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या तरुणीने आपल्या प्रियकराला शेवटचा व्हिडिओ कॉल केला आणि घरात कोणी नसताना हे टोकाचे पाऊल उचललं. या घटनेमुळे नागपुरात खळबळ उडाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, कानोल्हीबारा मार्गावरील आकार नर्सिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या मृतक विद्यार्थीनीचे नाव विध्येश्वरी दिनेशकुमार आपटे (२३) असून मुळ गाव वाशिम जिल्ह्यातील संभाजीनगर आहे.मागील काही दिवसापासून ती डिप्रेशनमध्ये गेल्यासारखी वागत होती. शनिवारला नागपुरातील लक्ष्मीनगर सायंटीफीक सभागृहात महाविद्यालयचा पदवीदान कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला तिच्या मैत्रिणी गेल्या. यावेळी ती घरात एकटीच होती. हीच संधी साधून तिने प्रियकराला व्हिडिओ काॅल करून आत्महत्या केली

विध्येश्वरी हि हिंगणा येथील आकार नर्सिंग महाविद्यालयातील अंतिम वर्षाला शिक्षण घेत होती. दरम्यान ती भोसलेवाडी जवळील डीएनडी हाइट्स या इमारतंमधील फ्लॅटमध्ये दोन मैत्रिणीसोबत राहत होती. गेल्या काही दिवसांपासून टेन्शनमध्ये असल्याने मैत्रिणी तिची विचारपूस देखील करत होत्या मात्र तिने आपल्या आयुष्याचा भयंकर शेवट केला.

धक्कादायक बाब म्हणजे गेल्या दोन दिवसांपूर्वी तिच्या प्रियकराचे लग्न झाले होते. याच कारणांमुळे तिने आत्महत्या केल्याची चर्चा आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. या घटनेमुळे कॉलेजसह नागपूरात खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!