पोहताना दम घुटून तरुण विहीरीत बुडाला ! वीस वर्षीय तरुणाचा सोरतापवाडीत दुर्दैवी मृत्यू..

उरुळी कांचन :पोहण्यासाठी गेलेल्या 20 वर्षाच्या मुलाचा विहरीत,बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोरतापवाडी – आळंदी म्हातोबा शिवेवर गुंजाळ मळा परिसरात घडली आहे. या घटनेत मुलाचा मृत्यू झाला असून पोलिसांच्या मदतीने मृतदेह विहरीतून बाहेर काढण्यात आला आहे.

रविवारी (दि. 29) दुपारी अडीच ते पाऊणे तीन वाजण्याच्या सुमारास हि घटना उघडकीस आली असून इस्माईल शेख(वय२० , रा.मगर वस्ती, आळंदी म्हातोबा)असे मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. तो स्थानिक मुलांसह पोहायला या विहीरीवर येत होता. पोहताना दम घुटून तो विहीरीत बुडाल्याचा अंदाज आहे.
दरम्यान विहीर बुडत असताना सोबत असलेल्या मित्रांनी आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील नागरिक मदतीसाठी धावूनगेले.मात्र विहीरीत बुडाल्याने त्याला मदत मिळू शकली नाही. या,घटनेची माहिती मिळताच उरुळीकांचन पोलिस ठाण्याचे पोलिस,उपनिरीक्षक प्रविण कांबळे व पोलिस हवालदार सुपेकर हे घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मृतदेहाला बाहेर काढण्यात आले आहे.
