खरेदीदारांना लॉटरी! उसळीनंतर पुन्हा एकदा सोन्याच्या दरात घसरण, 55 हजार रुपयांनी झाले स्वस्त, चांदी किती?


पुणे : गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या इराण आणि इस्राईलच्या युद्धाचा फटका आता व्यावसायिकांना देखील बसत आहे. या आखाती युद्धामुळे सोने आणि चांदीच्या दरात सतत चढउतार बघायला मिळत आहे. युद्ध सुरू झाल्यानंतर सोन्यासोबतच चांदीने झेप घेतली. आता नुकताच आज 29 मार्च 2026 चे सोने आणि चांदीचे भाव पुढे आले आहेत. सोने अजूनही त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा 55,000 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त आहे.

सोन्याचा उच्चांक पाहिला तर तो प्रति 10 ग्रॅम 2,02,984 रुपये आहे आणि आता सोने प्रति 10 ग्रॅम 55, 714 रुपयांनी स्वस्त झाले आहे. आज 24 कॅरेटचा भाव 1,42,942 रुपये/10 ग्रॅम आहे. 22 कॅरेटचा सोन्याचा भाव 1,39,510 रुपये/10 ग्रॅम आहे. 20 कॅरेट सोन्याचा भाव 1,27,220 रुपये/10 ग्रॅम आहे. उच्चांकानुसार, आजही सोने स्वस्त झाले आहे त्यामुळे खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

तसेच 1 किलो चांदीचा भाव 2.11 लाख रुपयांपेक्षा जास्त स्वस्त झाला आहे. इराण आणि अमेरिका युद्ध सुरू होण्यापूर्वी सोने आणि चांदीचे भाव गगणाला पोहोचले होते. या युद्धानंतर उच्चांकापेक्षा भाव कमी झाले. असूनही सोन्याचा भाव त्याच्या उच्चांकापेक्षा 55,000 रुपयांनी स्वस्तच आहे

मागील चांदीचे दर बघता सध्याच्या परिस्थितीला चांदीचे भाव घसरले आहेत. MCX वर चांदीचा आतापर्यंतचा उच्चांक 4,39,337 रुपये प्रति किलो आहे. पण सध्याच्या घडीला चांदीचा भाव हा प्रति किलो 2,11,587 रुपयांनी स्वस्त झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!