खरात प्रकरणी एकनाथ शिंदेंना चौकशीसाठी बोलावणार? संजय राऊतांनी बॉम्ब फोडला


पुणे : नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोपाच्या फेरी आहेत. या खरात प्रकरणी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चौकशीसाठी बोलावलं जावं अशी थेट मागणी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

संजय राऊत यांनी असं म्हटलं आहे की, नाशिकचा भोंदू बाबा खरात हा सरकारचा माणूस असून त्याचा मंत्रालयाच्या कामांमध्ये अधिक हस्तक्षेप असायचा. त्यामुळे त्याचे अनेक राजकीय नेत्यांसोबत कनेक्शन आहे. या पार्श्वभूमीवरच आता दीपक केसरकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार सुनील तटकरे रूपाली चाकणकर यांनाही चौकशीसाठी बोलवा. तसेच खरात हा अमित शहापर्यंत कसा पोहोचला याची चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी देखील राऊत यांनी केली आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, अशोक खरात हा भोंदू बाबा तर आहेच पण त्याच्या संपत्तीबाबत सरकारने उत्तर द्यायला पाहिजे. खरात सरकारचा माणूस आहे. त्याच्या पाठीशी 40 आमदार आहेत,” असा टोला राऊतांनी लगावला.

अशोक खरातची पोलीस कोठडीची मुदत आज संपत असून त्याला आज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे. आज न्यायालय या प्रकरणावर काय निकाल देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र न्यायालय पुन्हा पोलीस कोठडीची मुदत वाढवून देईल अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!