‘तू दिसायला सुंदर,नवऱ्याला तुझी खरी क्षमता..’,खरात महिलांना कसं जाळ्यात ओढायचा, चौकशीतून धक्कादायक उलगडा


पुणे : महिलांना फसवून अत्याचार करणारा नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याचे भिंग फुटल्यानंतर तपासात दररोज धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आज खरातची पोलीस कोठडी संपत असून, त्याला पुन्हा नाशिक जिल्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. आता त्याच्या चौकशीतून तो महिलांना आपल्या जाळ्यात कस ओढायचा याचा उलगडा झाला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार,अशोक खरात हा गरजू आणि मानसिकदृष्ट्या खचलेल्या, अडचणीत सापडलेल्या किंवा वैयक्तिक आयुष्यात गोंधळात असलेल्या महिलांना तो टार्गेट करायचा. त्यांच्या अडचणी दूर करायच्या नावाखाली तो महिलांना गुंगीचं औषध द्यायचा. त्यांच्याशी गोड बोलून जवळीक साधण्याचा प्रयत्न करायचा.भावनिक पातळीवर जवळीक साधून तो महिलांना आपल्या जाळ्यात ओढायचा. तू दिसायला खूप सुंदर आहेस. तुझा पती तुला समजून घेण्यात कमी पडतो. तुझी खरी क्षमता त्याला ओळखता येत नाही, असं गोडगोड बोलून अशोक खरात महिलांना मानसशास्त्रीय सापळ्यात अडकवायचा.

खरातने केलेल्या काळ्या कृत्यांचा एकामागून एक पर्दाफाश होत आहे. त्याच्या भोंदुगिरीच्या आणि आर्थिक फसवणुकीच्या अनेक घटना समोर येत आहेत. त्याच्याविरोधात आतापर्यंत एकूण दहा गुन्हे दाखल झाले आहेत. यातील आठ गुन्हे लैंगिक शोषणाचे आहेत. तर उर्वरित दोन गुन्हे आर्थिक फसवणुकीचे आहेत.

विशेष म्हणजे अशोक खरातच्या जाळ्यात अडकलेली महिला बाहेर पडू शकत नव्हती. तिच्या मानसिक स्थितीचा फायदा घेऊन अशोक खरात त्यांच्यावर अत्याचार करत असे, असं तपासात समोर आलं आहे. आज खरातची कोठडी संपत असून त्याला नाशिक जिल्हा न्यायालयात पुन्हा हजर केले जाणार आहे.या तपासादरम्यान आतापर्यंत काय माहिती समोर आली, याचा सविस्तर अहवाल आज न्यायालयात सादर केला जाणार त्यामुळे आज न्यायालय काय निर्णय देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!