भिडे गुरुजी आपण दोघे मिळून खरातला संपवू! माजी मंत्र्यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण, नेमका प्लॅन काय?


नाशिक : नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्यावर अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचे गंभीर आरोप होत आहेत. सुमारे 150 हून अधिक महिलांचे लैंगिक व आर्थिक शोषण केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. तसेच, विविध ठिकाणी जमिनी व भूखंड बळकावल्याच्याही तक्रारी समोर येत आहेत.

या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. विरोधी पक्षांसह अनेक सामाजिक संघटनांनी खरात याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, मनोहरराव भिडे यांनीही या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत संताप व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर एका माजी मंत्र्यांनी भिडे यांना मोठे आवाहन करत खरातविरोधात लढा उभारण्यासाठी सोबत येण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी खळबळ उडाली आहे.

बुलढाण्यातील माजी मंत्री सुबोध सावजी यांनी मनोहरराव भिडे यांच्या वक्तव्याला पाठिंबा दर्शवला आहे. नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सावजी यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

“भिडे गुरुजी, आपण या, मी आपल्या सोबत येतो,” असे म्हणत त्यांनी खरातविरोधात कठोर भूमिका घेण्याचे आवाहन केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या प्रकरणावरून आधीच राज्यभर संताप व्यक्त होत असून, विविध स्तरातून कठोर कारवाईची मागणी होत आहे. सावजी यांच्या वक्तव्यामुळे या वादाला आणखी धार मिळाल्याचे पाहायला मिळत आहे.

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात नवा धक्कादायक दावा समोर आला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कृष्णा चांदवड यांनी आरोप केला आहे की, खरात यांच्या सांगण्यावरून एका लोकप्रतिनिधीने बँकेचे स्थान बदलण्याचा निर्णय घेतला.

नाशिक जिल्हा बँकेचे कार्यालय द्वारका परिसरातून सीबीएस येथे हलवण्यात आले असून, या स्थलांतरामागे अशोक खरात यांचा प्रभाव असू शकतो, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. यासंदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून संबंधित अधिकाऱ्यांना पत्रही देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य समोर आल्यास संबंधित लोकप्रतिनिधीचे नाव जाहीर करण्यात येईल, असा दावा देखील करण्यात आला आहे.

दरम्यान, अशोक खरात गेल्या दहा दिवसांपासून पोलीस कोठडीत असून, त्याच्याकडून अजून महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याने आतापर्यंत दिलेल्या कबुलीजबाबाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. त्याची पोलीस कोठडी उद्या संपणार असल्याने पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!