“मिरवणुकीतील डॉल्बीच्या आवाजानेच आईला मारलं!” मुलाचे गंभीर आरोप,पुण्यात नेमकं काय घडलं?


पुणे: राज्यभरात रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आल्यानंतर पुण्यातून मोठी धक्कादायक माहिती समोर आली आहे. रामनवमीच्या मिरवणुकीसाठी ससाणेनगर परिसरात गुरुवारी रात्री डीजे लावण्यात आला होता. या डॉल्बीच्या कानठळ्या बसवणाऱ्या आवाजामुळे एका 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार,रंजना रवींद्र जाधव (रा. ससाणेनगर) असे मृत महिलेचे नाव आहे. रामनवमीची मिरवणूक पाहण्यासाठी त्या घराबाहेर आल्या असताना डीजेचा तीव्र आवाज सुरू होता. या आवाजामुळे अचानक त्यांच्या छातीत दुखू लागल आणि त्या खाली कोसळल्या.मिरवणुकीमुळे झालेली वाहतूक कोंडी आणि डीजेचा आवाज यामुळे त्यांना रुग्णालयात नेण्यास मोठा विलंब झाला. डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केले.

रंजना जाधव या लष्कराच्या ‘सीईमी’विभागातून निवृत्त झाल्या होत्या. डीजेच्या अति तीव्र आवाजाचा धक्का सहन न झाल्याने आईचा जीव गेल्याचा आरोप त्यांच्या मुलाने केला आहे. मात्र पोलिसांनी हे आरोप फेटाळले असून महिलेची पूर्वी हृदयविकाराची शस्त्रक्रिया झाली होती आणि त्या डायलिसिस वर होत्या असे स्पष्ट केले आहे.

दरम्यान ध्वनीप्रदूषणामुळे मानवी हृदयावर आणि श्वसनसंस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतात, असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. या घटनेमुळे आता शहरातील मंडळांच्या आवाजाच्या मर्यादेवर पुन्हा एकदा वादंग निर्माण झाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!