राज्य हादरलं! रात्रभर दोन मुलींना घरात उलट टांगले, नंतर जे घडलं त्याने सगळेच भयभीत झाले….


सांगली : सांगलीत दोन मुलींसाठी त्यांचे वडील हेच काळ ठरले. शुल्लक कारणावरून त्या पित्याने दोन्ही लहान मुलींसोबत जे केलं त्याने अख्खं राज्य हादरले आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. त्याचा कारनामा वाचून मन अगदी सुन्न झाले आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

याठिकाणी चोरी केल्याच्या संशयातून एका इसमाने त्याच्या दोन्ही लहान मुलींना उलटं टांगून ठेवलं. या भयानक प्रकारामुळे एका मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच दुसरीची तब्येत गंभीर असल्याचे समजते. या भयंकर घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. आटपाडी तालुक्यामध्ये हा संतापजनक प्रकार घडला आहे.

याबाबत माहिती अशी की, किरकोळ कारणावरून जन्मदात्यानेच आपल्या लेकीचा जीव घेतला आटपाडी तालुक्याच्या बनपुरीमध्ये हा अतिशय भयानक आणि संतापजनक प्रकार घडला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दादू यमगर असं या पित्याचे नाव आहे.

यमगर यांच्या घराशेजारी राहणाऱ्या एका कुटुंबाने, त्यांच्या या दोन्ही मुलींवर संशय घेत त्यांच्यावर आळ लावला होता. मात्र या घटनेमुळे संतापलेल्या दादू यमगर याने त्याच्या 10 आणि 13 वर्षांच्या मुलींना जीवघेणी शिक्षा केली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस सध्या सविस्तर माहिती घेत आहेत. त्याने दोन्ही मुलींना घरात रात्रभर खुंटीला उलट टांगून ठेवलं.

यानंतर एका मुलीचा तडफडून मृत्यू झाला, तसेच दुसऱ्या मुलीचीही प्रकृती अत्यंत गंभीर असून तिच्यावर आटपाडीतील रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहेत. या प्रकरणी दादू यमगर या बापाला आटपाडी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. दरम्यान आटपाडी पोलिसांकडून याबाबत कोणत्याही प्रकारचा तक्रार झाली नाही.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!