ठाण्यात क्रिकेट कोचकडून अल्पवयीन मुलींचा विनयभंग,शरीराला चुकीच्या पद्धचीने स्पर्श करायचा अन्…

मुंबई : गेल्या काही दिवसापासून राज्यात मुली आणि महिलांच्या वारंवार अत्याचाराच्या घटना समोर येत असतानाच आता ठाणे जिल्ह्यातील टिटवाळ्यामध्ये क्रिकेट कोच कडूनच अल्पवयीन मुलींचा विनयभंग झाला असल्याची माहिती समोर आली आहे.या घटनेमुळे स्थानिकांमध्ये संताप व्यक्त होत असून मुलींच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, 59 वर्षीय असणारा आरोपी खाजगी क्रिकेट कोच म्हणून काम करत होता.गेल्या वर्षी दिवाळीच्या काळात आरोपीने एका मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला होता. त्यानंतर नुकतंच आता दुसऱ्या मुलीशीही अशाच प्रकारे विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मुलींनी आपल्या पालकांना दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. यानंतर तात्काळ पीडीतेच्या पालकांनी कल्याण तालुका पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
तक्रार मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी कोचला ताब्यात घेतलं आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे पालकांमध्ये मुलींच्या सुरक्षिततेबाबत चिंता वाढली आहे.

क्रिकेट शिकवणाऱ्या कोच कडूनच असे वर्तन झाल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.आरोपीने यापूर्वीही शेजारच्या मुलीशी अशाच प्रकारे वर्तन केलं होतं.त्यामुळे या तपासातून आणखी काही माहिती समोर येण्याची शक्यता आहे.