घसरणीनंतर सोनं पुन्हा चमकलं! दरात वाढ; १० ग्रॅमचा ताजा भाव जाणून घ्या…

पुणे : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वाढू लागले आहेत. आणि गेल्या आठवडाभरात त्यात झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळं सोनं खरेदी करावं की नको असा सवाल नागरीकांमधून उपस्थित केला जात आहे.

सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी आहे. अशातच आज २७ मार्च २०२६ रोजी, शुक्रवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. सोन्याच्या दरात वाढ झाली आहे तर चांदीच्या दरातही बदल झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
‘बुलियन मार्केट’ या संकेतस्थळानुसार, २७ मार्च २०२६ रोजी देशातील सोन्या-चांदीच्या दरांमध्ये वाढ नोंदवली गेली आहे. १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १,४१,७३० रुपये असून, २२ कॅरेट सोन्याचा दर १,२९,९१९ रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे.

तसेच, १ किलो चांदीचा दर २,२५,०१० रुपये असून १० ग्रॅम चांदीसाठी सुमारे २,२५० रुपये मोजावे लागत आहेत. उत्पादन शुल्क, राज्यस्तरीय कर तसेच दागिन्यांवरील मेकिंग चार्जेस यामुळे देशभरात सोन्याच्या दागिन्यांच्या किमतींमध्ये फरक दिसून येतो.
काय आहे आज तुमच्या शहरांतील सोनाच्या भाव?
मुंबई –
२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १,२९,६९० रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याची किंमत १,४१,४८० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे –
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर १,२९,६९० रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याचा दर १,४१,४८० रुपये आहे.
नागपूर –
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर १,२९,६९० रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याचा १,४१,४८० रुपये इतका आहे.
नाशिक –
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर १,२९,६९० रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याचा दर १,४१,४८० रुपये आहे.