तब्बल 2000 कोटींचा घोटाळा, अश्लील व्हिडिओ काढून महिलांना धमकावलं, IRS अधिकाऱ्याचा कारनामा, भाजप नेत्याचा गंभीर आरोप

पुणे : नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरातचे महिलांबाबतचे धक्कादायक कारनामे समोर येत असतानाच आता IRS अधिकारी सचिन मोटे यांच्यावर भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी तब्बल दोन हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा दावा पडळकर यांनी केला आहे.दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिलेत.

गोपीचंद पडळकर म्हणाले की, सचिन मोटे यांनी DDSR कंपनीच्या नावाखाली सुमारे 20 प्रकल्प राबवत गुंतवणूकदारांकडून पैसे उकळले आहेत. 9 ते 18 महिन्यांत पैसे दुप्पट करण्याचं आमिष दाखवून कोट्यवधी रुपये गोळा केले.नातेवाईकांच्या नावाने डीडीएसआर कंपनीच्या नावे 20 प्रकल्प सुरू केले. आमदार व खासदारांसाठी इमारत ते तयार करत आहेत. आमदार व खासदार आमच्या खिशात असल्याचे ते सांगत आहेत, या माध्यमातून त्यांनी 2 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप पडळकरांनी केला आहे.
तसेच सचिन मोटे याने जे गुंतवणूकदार आहेत त्यांचे महिलांसोबतचे व्हिडिओ तयार केले आहेत.महिलांचे अश्लील व्हिडिओ काढून त्यांना धमकावत असे. आणि त्यांच्याकडून पैसे उकळत असे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जॉईंट सीपी दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत त्यांची चौकशी सुरू करण्याचे आदेश दिल्याचे पडळकर यांनी सांगितले. खरातनंतर एका IRS अधिकाऱ्यांच्या समोर आलेल्या या कारनाम्याने राजकीय वर्तुळात देखील खळबळ उडाली आहे.
