खरात प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडमध्ये ;ते व्हिडिओ तात्काळ डिलीट करा अन्यथा…


पुणे : नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याचे धक्कादायक कारनामे समोर येत आहेत. याचे अनेक अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. याप्रकरणीय आता पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले असून त्यांनी हे व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ज्यांच्या कोणाकडे ते व्हिडिओ असतील त्यांनी ते तात्काळ डिलीट करा असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

पोलिसांनी अशोक खरात प्रकरणाचे व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांना इशारा दिला आहे. कोणाकडेही पीडित महिलेची ओळख, तिच्या नातेवाईकांची ओळख, तिच्या घराची, तिच्या कुटुंबीयांची ओळख उघड होईल, असे व्हिडीओ किंवा अश्लील व्हिडीओ असल्यास तत्काळ डिलिट करावेत. सोशल मीडियावर प्रसारीत करू नये. असे व्हिडीओ प्रसारीत केल्यास संबंधितांवर आणि ग्रुप अॅडमीनवर गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच त्यांना अटक करून कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्याच्या कोपरगावमधील संशयित आरोपी राहुल शिंदे याला त्याचा मित्र योगेश आढावने तर योगेश आढाव याला बीड जिल्ह्यातील माजलगाव मधील संदीप गरजे याने हे व्हिडिओ पाठवल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. पोलिसांनी व्हिडिओ पाठवणाऱ्यांची साखळीच उघडकीस आणली आहे.. या तीनही संशयित आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांच्या स्वतंत्र टीम रवाना झाल्या आहेत.

याप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम २९४ (२), ३ (५) सह माहिती तंत्रज्ञान कायदा २००० चे कलम ६७ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या खरात प्रकरणातून अनेक धक्कादायक गोष्टींचा उलगडा होत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!