शेतकऱ्यांना दिलासा!PM Kisan योजनेसाठी सरकारची ‘फेस ऑथेंटीकेशन’ सिस्टीम, घरबसल्या eKYC करता येणार..


मुंबई : देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठरलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा बाविसावा हप्ता वितरित झाल्यानंतर आता सर्व शेतकऱ्यांचे लक्ष 23 हप्त्याकडे लागले आहे. अशातच आता केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.ज्यामुळे आता शेतकऱ्यांना घरबसल्या केवायसी करता येणार आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी यापूर्वी ई-केवायसीसाठी ओटीपीची आवश्यकता होती. मात्र नेटवर्क समस्या किंवा ओटीपी उशिरा मिळणे यामुळे अनेक शेतकऱ्यांना वेळेत प्रक्रिया पूर्ण करता येत नव्हती. त्यामुळे या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना घेता येत नव्हता. मात्र आता केंद्र सरकारने घेतलेल्या मोठ्या निर्णयामुळे ही केवायसी प्रक्रिया आता सोपी करण्यात आली आहे.आता शेतकरी ‘फेस ऑथेंटीकेशन’ सुविधेच्या मदतीने घरबसल्या सहजपणे आपले ई-केवायसी पूर्ण करू शकणार आहेत.

फेस ऑथेंटिकेशन करताना कोणती काळजी घ्यायची?

फेस स्कॅन करताना पुरेसा प्रकाश असणे आवश्यक आहे, जेणेकरून कॅमेरा चेहरा स्पष्टपणे ओळखू शकेल. तसेच चेहरा स्थिर ठेवून थेट कॅमेऱ्याकडे पाहणे महत्त्वाचे आहे. काही सेकंदांतच प्रणाली आधार डेटाशी पडताळणी करून प्रक्रिया पूर्ण करते.

या नवीन फेस ऑथेंटिकेशन सुविधेमुळे या अडचणी दूर होणार असून, केवळ चेहरा स्कॅन करून काही मिनिटांत ई-केवायसी पूर्ण करता येणार आहे.सरकारच्या मते, या बदलामुळे 23 व्या हप्त्याच्या वितरणात विलंब होण्याची शक्यता नक्कीच कमी होणार आहे

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!