गॅस सिलेंडरच्या किंमती कमी होणार? तब्बल सात वर्षानंतर भारताची इराणसोबत भागीदारी,खरेदी केला LPG


पुणे : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या इराण आणि इस्राईलच्या युद्धामुळे एलपीजीचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे एलपीजी गॅस आणि पेट्रोल डिझेलचे दर वाढण्याची शक्यता वर्तवली जात सर्व सामान्यांसाठी दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. तब्बल सात वर्षानंतर पहिल्यांदाच भारताने एलपीजी गॅससाठी इराणसोबत भागीदारी केल आहे. इराणकडून एलपीजी खरेदी केला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, इराणकडून येणारा एलपीजीचा साठा चीनला जाणार होता. परंतु भारताने संपर्क साधून हा साठा भारतात आणण्यासाठी प्रयत्न केले. हे जहाज मंगळुरु बंदरात दाखल होणार आहे. हा गॅस देशातील तीन तेल कंपन्यांना वितरित केला जाईल. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि बिंदुस्तान पेट्रोलियम या तीन देळातील सरकारी तेल कंपन्या आहे. त्या संपूर्ण देशात गॅस पुरवठा करतात.

दरम्यान 2019 नंतर पहिल्यांदाच भारताने इराणकडून एलपीजी खरेदी केली आहे. अमेरिकेने इराणवरील काही निर्बंध शिथिल करण्याचे संकेत दिल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.
विशेष म्हणजे भारताने याबाबत इराणशी भागीदारी केली असली तरी या एलपीजी साठ्याचे पेमेंट भारत रुपयांमध्ये करणार आहे. त्यामुळे डॉलरवर कमी अवलंबून राहावे लागणार आहे.यामुळे परकीय चलन साठ्यावरील दबाव कमी होणार नाही परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर रुपयाची विश्वासार्हता वाढणार आहे. या एका पाऊलामुळे भारताला खूप फायदा होणार आहे.

भारत हा देशातील दुसरा सर्वात मोठा एलपीजी आयात करणारा देश आहे. देशातील गरजेपैकी 60 टक्के गॅस हा आयात होतो. यातील जास्तीत जास्त गॅस मध्य पूर्वेकडून भारतात येते. होमुर्झच्या सामुद्रधुनी येथे सुरु असलेल्या युद्धामुळे पुरवठा करण्यास व्यत्यय येतो. परंतु एलपीजी गॅसची खरेदी भारतासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!