मराठेशाहीचा इतिहासकार हरपला!ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचं निधन


कोल्हापूर : महाराष्ट्राच्या इतिहास संशोधन क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व,ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचं आज निधन झाल आहे. वयाच्या 85 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोल्हापुरा गेल्या काही दिवसापासून त्यांच्यावर कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.

डॉ. जयसिंगराव पवार यांचा जन्म 30 डिसेंबर 1941 रोजी सांगली जिल्ह्यातील तडसर येथे झाला. डॉ. जयसिंगराव पवार यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून एम.ए.आणि पीएच.डी. पदवी संपादन केली. तीन दशकांहून अधिक काळ महाविद्यालयीन क्षेत्रात विद्यार्थिप्रिय प्राध्यापक म्हणून अध्यापन केले. महाविद्यालयातील एम.ए.पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी 20 क्रमिक पुस्तके लिहिली.

शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू व इतिहास संशोधक डॉ. अप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. जयसिंगराव यांच्या संशोधन कारकिर्दीला 1964 मध्ये सुरुवात केली. या काळात त्यांनी विद्यापीठातील इतिहास विभागात त्यांनी ऐतिहासिक कागदपत्रांच्या संशोधनाचा अनुभव घेतला. त्यांनी महाराणी ताराबाई, सेनापती संताजी घोरपडे, मराठेशाहीचा मागोवा, राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ इत्यादी एकूण 25पेक्षा अधिक इतिहासविषयक ग्रंथ लिहिले.

इतिहास संशोधन व त्याद्वारा समाजप्रबोधन हे त्यांचे उद्दिष्ट असून, त्यानुसार संस्थेतर्फे 1200 पानांचा, तीन खंडांचा राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ 2001 मध्ये प्रसिद्ध केला. भारतातील 16 भाषांमध्ये तसेच रशियन, फ्रेंच, इटालियन, जपानी या परकीय भाषांमध्ये अनुवादाचे काम सुरू आहे. यांपैकी कन्नड, कोकणी, इंग्लिश, जर्मन, उर्दू व तेलुगू, आणि हिंदी भाषेतील ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत.

इतिहास संशोधन क्षेत्रातील कार्याचा गौरव म्हणून डॉ. जयसिंगराव पवार यांना राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच माजी राष्ट्रपती प्रवण मुखर्जी यांच्या हस्ते शाहू चरित्र या ग्रंथाचे प्रकाशन करून शाहूचरित्रकार म्हणून पुणे येथे त्यांचा सन्मान करण्यात आला होता. त्यांच्या निधनाने राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!