गॅस टंचाईला पर्याय! राज्यात रॉकेल वितरण पुन्हा सुरू होणार? शासनाचा जीआर आला


मुंबई : राज्यात मागील काही वर्षांपूर्वी शिधापत्रिकेवरून बंद करण्यात आलेले रॉकेलचे वितरण आता पुन्हा एकदा सुरू करण्यात येणार आहे.सध्याच्या आखाती युद्धाच्या परिस्थितीमुळे एलपीजीचा तुटवडा जाणवू लागल्याने केंद्र सरकारने 12 मार्च 2026 रोजी महाराष्ट्रासाठी 3,744 किलोलीटर (सुमारे 37.44 लाख लिटर) केरोसिनचा कोटा मंजूर केला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना आता दिलासा मिळाला आहे.

राज्याला मंजूर करण्यात आलेल्या 3,744 KL केरोसिनचे वितरण नियोजित पद्धतीने करण्यात येणार आहे. प्रत्येक शिधापत्रिकाधारक कुटुंबाला 3 लिटर रॉकेल देण्याची तरतूद करण्यात आली आहे.रॉकेल वितरणात अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. यानंतर उपलब्धतेनुसार श्वेत पत्रिकाधारकांनाही रॉकेल मिळू शकते.रॉकेल वितरण मार्च 2026 महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वाटप सुरू झाल्यानंतर 45 दिवसांच्या आत संपूर्ण साठा उचलणे बंधनकारक राहणार आहे.

तसेच तसेच ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही, अशा कुटुंबांनाही ग्रामपंचायतीच्या रहिवासी दाखल्याच्या आधारे रॉकेल दिले जाणार आहे.स्थलांतरित मजूरांनाही केंद्र किंवा राज्य सरकारच्या ओळखपत्राच्या आधारे या योजनेचा लाभ मिळणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या इराण आणि इस्रायल युद्धाचा फटका व्यवसायिकासकट सर्वसामान्यांना बसला आहे. या आखाती युद्धामुळे गॅसचा तुटवडा जाणवू लागला आहे. या पार्श्वभूमीवरच आता राज्य सरकारने एलपीजीला पर्यायी इंधन म्हणून तात्पुरत्या स्वरूपात रॉकेल वितरणाचा निर्णय घेतला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!