चेंजिंग रूम, प्रसाधनगृह, अशोक खरातच्या मंदिरासाठी 105 कोटींचा निधी केलेला मंजूर, मंत्र्यांचे नावही आलं समोर…


नाशिक : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी आता नवनवीन खळबळजनक खुलासे समोर येत आहेत. अशोक खरातच्या ईशान्येश्वर मंदिराच्या विकासासाठी तत्कालीन महायुती सरकारने तब्बल दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याची बाब आता उघडकीस आली आहे.

विशेष म्हणजे, हा निधी मिळवून देण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी आणि मंत्र्यांनी मदत केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. अशोक खरातच्या ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा निधी मंजूर करण्यात आला होता. 2018 चा शासन निर्णय (जीआर) समोर आला आहे. तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडून 105 कोटींचा रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता.

31 मार्च 2018 रोजी ईशान्येश्वर मंदिरासाठी जीआर काढण्यात आला होता. या 105 कोटींमधून 25 लाख रुपये तत्काळ मंजूर झाला होता. सभामंडप बांधकाम, पेव्हर ब्लॉक बसवणे, महिला व पुरुष प्रसाधनगृह, चेंजिंग रूम, भक्तनिवास बांधकाम, विद्युतीकरण व लैंडस्केपिंग करता निधी मंजूर केल्याची बाब उघडकीस आली आहे.

अशोक खरातवर शिर्डीत आणखी एक गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक खरातविरोधात काल पीडित तरुणीने एफआयआर दाखल केली आहे. अशोक खरातनं 4 वेळा बलात्कार केल्याची पीडित मुलीची तक्रार आहे. अशोक खरातनं गुंगीचं औषध देऊन बलात्कार केल्याची तक्रार पीडितेने पोलिसांकडे केली आहे. वाच्यता केल्यास दैवी शक्तीने आई-वडिलांना मारुन टाकीन अशी धमकीही दिली.

जुलै ते डिसेंबर 2024 दरम्यान अशोक खरातने चार वेळा बलात्कार केल्याची तक्रार पीडितेने दाखल केली आहे. शेतात घर बांधण्यासाठी योग्य जागा सांगा, म्हणत पीडित तरुणीचे कुटुंब अशोक खरातकडे गेले होते. तिसऱ्या भेटीत मुलीनं कोणत्या शाखेला प्रवेश घ्यावा, अशी विचारणा कुटुंबीयांकडून करण्यात आली. यावेळी पीडितेसोबत अशोक खरातने अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे.

अशोक खरात याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नाशिकमध्ये सरकारवाडा पोलिसांत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशोक खरात याने एका 35 वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याच्या आरोपाखाली त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. बुधवार 18 मार्च रोजी खरात याला पहाटे तीन वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेकडून ताब्यात घेण्यात आले.

अशोक खरात हा सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे. तो मर्चंट नेव्हीतून निवृत्त झाला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कॉस्मॉलॉजी एक्स्पर्ट आणि अंकशास्त्रज्ञ म्हणून तो नावारुपाला आला. अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी जातात. मात्र, त्याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!