ब्रेकिंग! अजित पवारांच्या विमान दुर्घटनेबाबत अखेर कर्नाटकात गुन्हा दाखल; रोहित पवारांच्या लढ्याला यश.


पुणे : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी अनेक पत्रकार परिषदा घेऊन शंका उपस्थित केल्या होत्या. ही दुर्घटना नसून मोठा कट असल्याची तक्रार देखील त्यांनी केली होती. त्यांनी केलेल्या लढ्याला अखेर यश आलं असून दुर्घटनेप्रकरणी कर्नाटकच्या बंगळुरू येथील शेशाद्रीपुरम पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेनंतर आमदार रोहित पवार यांनी अनेक पत्रकार परिषदेतून या दुर्घटनेचा पाठपुरावा केला. अनेक व्हिडिओ पुरावे सादर करून हा अपघात नसून घातपात असल्याचा दावा देखील त्यांनी केला.त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ही दुर्घटना केवळ अपघात नसून उपमुख्यमंत्र्यांना लक्ष्य करणाऱ्या मोठ्या गुन्हेगारी कटाचा भाग असू शकतो असे त्यांनी म्हटलं होतं.

तसेच तक्रारीत विमान सुरक्षेच्या नियमांचे पद्धतशीर उल्लंघन, नोंदींची बनावट कागदपत्रे तयार करणे, देखभाल आणि ऑपरेशनमध्ये गंभीर निष्काळजीपणा अशा अनेक बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे.या दुर्घटनेप्रकरणी आता कर्नाटकच्या बंगळुरू येथील शेशाद्रीपुरम पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अजित पवार ज्या विमानात बसले होते. ते विमान VSR कंपनीचे होते. या दुर्घटनेत विमानातील सर्व पाच जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मृत अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 173(1) अंतर्गत ‘झिरो FIR’ म्हणून तक्रार दाखल केली आहे.

यापूर्वी त्यांनी 25 फेब्रुवारी रोजी मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे तसेच 26 फेब्रुवारी रोजी बारामती पोलीस ठाण्यात संपर्क साधला होता. मात्र, FIR नोंदवण्यात आला नव्हता. मात्र अखेर रोहित पवारांच्या लढ्याला यश आल आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!