संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट! फरार कृष्णा आंधळेला पकडण्यासाठी CID चा मास्टरप्लॅन, आता थेट..


पुणे : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 14 महिने पेक्षा जास्त कालावधी उलटून गेला आहे. तरी देखील या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे. त्याला पकडण्यासाठी आता सीआयडीने मोठा निर्णय घेतला आहे. आरोपी कृष्णा आंधळेची माहिती देणाऱ्या व्यक्तीला सीआयडीकडून बक्षीस देण्याची घोषणा करण्यात आली आहे. कृष्णा आंधळेची माहिती देणाऱ्या व्यक्तीला सीआयडीकडून एक लाख रुपयांचं बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण, हत्या आणि मकोका असे गंभीर गुन्हे दाखल असलेला आरोपी कृष्णा आंधळे याची माहिती देणाऱ्या व्यक्तीस आता एक लाखाच बक्षीस मिळणार आहे.तसेच आरोपीची माहिती देणाऱ्या व्यक्तीची माहिती गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचं सीआयडीकडून जाहीर करण्यात आलं आहे. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आलं आहे, मात्र अजूनही कृष्णा आंधळे फरार आहे. त्याबद्दल न्यायालयाकडून सीआयडीला विचारणार करण्यात आली होती. त्यानंतर आता सीआयडी अ‍ॅक्शन मोडमध्ये आली आहे.

यापूर्वी ही कृष्णा आंधळे याच्या फोटोसहीत पोलिसांनी पत्र काढले होते.यामध्ये कोणाला त्याच्या ठाव ठिकाणची माहिती किंवा संशयित आरोपी दिसून आल्यास तात्काळ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आरोपीची माहिती द्यावी.माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल व त्यांना योग्य ते बक्षीस देण्यात येईल असे प्रसिद्धी पत्रकात पोलिसांकडून आव्हान करण्यात आले होते. मात्र तरी देखील पोलिसांना कृष्णा आंधळेला पकडण्यात अपयश आले आहे.

सरपंच संतोष देशमुख यांचे नऊ डिसेंबर रोजी टोलनाक्यावरून अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती.या प्रकरणातील संबंधित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल असून यातील एक आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. याला पकडण्यासाठी आता सीआयडीने मास्टर प्लॅन केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!