ब्रेकिंग! केंद्र सरकार लोकसभेच्या जागा वाढवणार, महिला आरक्षणासह 2029 निवडणुकांसाठी मास्टर प्लॅन

मुंबई : केंद्र सरकारकडून मागील काही काळापासून लोकसभेच्या जागा वाढवण्याबाबत चर्चा सुरू होती.अखेर जागा वाढवण्याच्या हालचालींना आता वेग आला असून या ऐतिहासिक बदलासाठी गृहमंत्री अमित शहा यांनी कंबर कसली आहे.

सरकारच्या या नवीन योजनेनुसार, लोकसभेतील एकूण सदस्यसंख्या सध्याच्या 543 वरून थेट 816 पर्यंत वाढू शकते. यामध्ये वाढीव 273 जागा या प्रामुख्याने महिलांसाठी राखीव ठेवण्याचा केंद्र सरकार विचार आहे. ‘लॉटरी सिस्टीम’द्वारे दर तिसरी जागा महिलांसाठी राखीव ठेवून महिला आरक्षणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचा सरकारचा मानस आहे. यामुळे विद्यमान पुरुष खासदारांना धक्का न लावता महिलांचे प्रतिनिधित्व वाढवता येणार आहे.
लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेबाबत केंद्र सरकारने ‘मिशन 2029’ अंतर्गत राजकीय हालचालींना वेग आणला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विविध राजकीय पक्षांसोबत चर्चा सुरू केल्या आहेत.मात्र दुसरीकडे लोकसंख्येच्या आधारावर जागा वाढवल्यास दक्षिण भारतातील राज्यांचे प्रतिनिधित्व कमी होईल, अशी भीती व्यक्त केली जात होती. त्यावर केंद्र सरकारने तोडगा काढला आहे

लोकसभा मतदारसंघ पुनर्रचनेसाठी 2011 ची जनगणना आधार मानून राज्यांमधील जागांचे सध्याचे गुणोत्तर कायम राखले जाणार आहे. या निर्णयामुळे लोकसभेत बहुमताचा आकडा 272 वरून थेट 409 वर पोहोचणार आहे. या निर्णयामुळे देशाच्या राजकारणाची दिशा पूर्णपणे बदलणार आहे.