सातारा ZP वाद चिघळला!मध्यरात्री ‘वर्षा’वर फडणवीस-शिंदेंमध्ये खलबतं, तोडगा काय?

मुंबई : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत झालेल्या राड्यावरून महायुतीत मोठी ठिणगी पडली आहे. या पार्श्वभूमीवरच मध्यरात्री ‘वर्षा’ बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात खलबतं झाली. या बैठकीत नेमका तोडगा काय निघाला याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागल आहे.

विधानभवनात सातारा जिल्हा परिषद प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वादावाद झाला. या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावरील भेट महत्त्वाची मानली जात आहे.विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी सातारा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या आदेशावर कायदेशीर आणि राजकीय भूमिका काय असावी, यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा झाली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या बैठकीच्या माध्यमातून नेत्यांमध्ये समन्वय साधून या वादावर पडदा पडणार का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागले आहे. आज विधानभवनाचे कामकाज सुरू झाल्यावर या प्रकरणाचे काय पडसाद उमटतात आणि सरकार यावर काय स्पष्टीकरण देतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
