पुण्यात ठाकरेंना मोठा धक्का! वसंत मोरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार, न्यायालयाने ‘तो ‘जामीन फेटाळला

पुणे : शिवसेना ठाकरे सेनेचे नेते वसंत मोरे यांच्या अडचणीत आता पुन्हा एकदा वाढ झाली आहे. त्यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जामीनासाठी त्यांनी पुणे सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता मात्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार लटकली आहे.

काही दिवसापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ठाकरे सेनेचे नेते वसंत मोरे यांनी विश्वनाथ लहाडे यांचा उल्लेख करताना त्यांच्याबाबत आक्षेपार्ह आणि बदनामीकारक वक्तव्य केल होत. यावरून त्यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादींनी या वक्तव्यामुळे त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचल्याचे आणि समाजातील स्थानावर परिणाम झाल्याचे म्हटले होते.या प्रकरणात वसंत मोरे यांनी अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. मात्र पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने अर्ज नाकारला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष अविनाश लहाडे यांनी वडील विश्वनाथ लहाडे यांच्याबद्दल वसंत मोरेंनी आक्षेपार्ह टिपणी केल्याचा आरोप केल्यानंतर त्यांच्या विरोधात अनुसूचित जाती -जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी मोरेनीं सत्र न्यायालयात धाव घेतली होती.मात्र न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद सविस्तर ऐकून घेतला आणि प्रकरणाची गांभीर्य आणि पुराव्याशी प्राथमिक पडताळणी लक्षात घेऊन न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला.

पत्रकार परिषदेत केलेल्या विधान वसंत मोरे यांना चांगलच भोवलं आहे. न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्याने आता शिवाजीनगर पोलिसांना मोरेंना ताब्यात घेण्याचा कायदेशीर मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला देखील मोठा धक्का बसला आहे.