भोंदूबाबा खरात प्रकरणात राज्यातील बड्या नेत्याचा भयंकर खुलासा, थेट नाव घेत म्हणाले अजून..

मुंबई : संजय राऊत यांनी साताऱ्यातील प्रकरणावरून जोरदार टीका केली आहे. त्यांनी मोठं विधान करत म्हटलं की, राज्यातील सत्तेतील मित्रपक्ष जास्त काळ एकत्र राहू शकत नाहीत. साताऱ्यात घडलेली घटना ही गुंडगिरी आणि झुंडगिरीचं उदाहरण असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले आहे

तसेच, घटना घडली तेव्हा तुमच्यातील शिवसैनिक कुठे गेला? असा सवाल उपस्थित करत भारतीय जनता पक्षच्या मंत्र्यांनीच रस्त्यावर मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला. याचदरम्यान राऊतांनी भोंदुबाबा खरात प्रकरणावरही भाष्य केलं.
या प्रकरणात मंत्री आणि अधिकाऱ्यांची नावे समोर आली पाहिजेत, अशी मागणी करत अजूनही अनेक महत्त्वाच्या गोष्टी बाहेर येणं बाकी असल्याचे संकेत त्यांनी दिले. राऊतांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

संजय राऊत यांनी तीव्र शब्दांत टीका करत म्हटलं की, जे लोक “लोकशाहीचा खून झाला” असा दावा करतात, त्यांच्याच हातावर लोकशाहीच्या खुनाचे डाग आहेत.ते पुढे म्हणाले की, काल विधीमंडळाच्या पायऱ्यांवर काही आमदार आणि नेते एकत्र येऊन लोकशाहीचा खून झाल्याच्या घोषणा देत होते. यामध्ये काही मंत्रीही होते, ज्यांना मी स्वतः पाहिलं.
राऊतांनी टोला लगावत म्हटलं की, जेव्हा हेच नेते शिवसेना सोडून गेले, तेव्हा वाघाचं कातडं पांघरलेले हे लोक मोठमोठ्या गर्जना करत होते. संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल करत म्हटलं की, स्वाभिमानासाठी, हिंदुत्वासाठी पक्ष सोडल्याचा दावा करणारेच काल विधीमंडळाच्या पायऱ्यांवर ‘वाघ’ नसून कातडं पांघरलेली मांजरे आणि बोके असल्याचं दिसून आलं.
ते पुढे म्हणाले, सरकारमधील मंत्र्यांची ही अवस्था का झाली? भारतीय जनता पक्षच्या मंत्र्यांनीच तुम्हाला साताऱ्याच्या रस्त्यावर मारहाण केली. मग तुमच्यातला शिवसैनिक कुठे गेला? बाळासाहेब ठाकरे यांनी घडवलेला तो मर्द मावळा कुठे हरवला? राऊतांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण पुन्हा तापण्याची चिन्हं दिसत आहेत.