चैत्र पौर्णिमेनिमित्त प्रशासनाचा मोठा निर्णय! तुळजाभवानीचे मंदिर 22 तास दर्शनासाठी खुले राहणार.


पुणे : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक‎ असलेल्या आई तुळजाभवानी मातेच्या चैत्र पौर्णिमा उत्सव कालावधीत राज्यभरासह कर्नाटक, आंध्र प्रदेश,‎तेलंगणा या राज्यातून 25 लाख‎ भाविक दर्शनासाठी येणार आहेत.‎ या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मोठा निर्णय घेत 31 मार्च ते 2 एप्रिलदरम्यान‎ तुळजाभवानीचे मंदिर 3 दिवस‎ दररोज 22 तास दर्शनासाठी खुले‎ ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

तुळजाभवानी मातेच्या चैत्र‎पोर्णिमा उत्सव कालावधीत‎ भाविकांची संख्या गतवर्षीच्या‎ तुलनेत यंदा तीन लाखांची वाढ‎ होण्याची शक्यता आहे. त्यानुषंगाने‎ भाविकांसाठी पिण्याचे पाणी,‎सावलीची व्यवस्था करण्यात येत‎ आहे. देवस्थानच्या वतीने‎ दिवसभराचे दर्शन झाल्यानंतर‎ रात्रीच्या वेळी परिसराची स्वच्छता‎ केली जाते. या शिवाय हळदी-‎कुंकू, खेळणी, पाळणीचे स्टाँल‎ लावण्यात येत आहेत.

आई तुळजाभवानी मातेच्या पौर्णिमा‎ उत्सवादरम्यान उन्हाचा पारा‎ वाढण्याची शक्यता लक्षात घेता‎ मंदिरात शेडनेट टाकून सावलीची‎ व्यवस्था करण्यात येत आहे.‎जागोजागी भाविकांना रांगेतच‎ ओआरएस उपलब्ध करुन दिले‎ जाईल. त्यासाठी स्वयंसेवक‎नियुक्त केले जाणार आहेत.या कालावधीत या तीन दिवसांत‎ छबिन्याचे आकर्षण असणार आहे.‎

तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी राज्यभरासह परराज्यातील भाविकांची मोठी‎ गर्दी होणार आहे. त्यात 22 तास मंदिर दर्शनासाठी खूले‎ राहणार असल्याने 22 तास वीजपुरवठा सुरू ठेवण्याचे‎आदेश प्रशासनाने महावितरणला देण्यात आले आहेत.‎ यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!