संतोष देशमुखांच्या हत्येनंतर मस्साजोगची पोटनिवडणूक जाहीर; नवा कारभारी कोण असणार?


पुणे : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आता मस्साजोग येथील निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. रिक्त झालेल्या सरपंच पदाची पोटनिवडणूक लवकरच होत आहे. राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून 28 एप्रिल रोजी मतदान तर 29 एप्रिलला निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे मस्साजोगचा नवा कारभारी कोण? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबर 2024 मध्ये वाल्मीक कराड आणि त्याच्या टोळीने हत्या केली होती. तेव्हापासून मस्साजोगचं सरपंचपद रिक्त आहे. आता बीड जिल्ह्यातील 88 जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे.त्यानुसार आता मस्साजोगचा नवीन कारभारी कोण असणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार बीड जिल्ह्यातील 88 जागांसाठी पोटनिवडणूक होत असून त्यातील 16 थेट सरपंच आणि 72 सदस्य पदांच्या निवडी होणार आहेत. विशेष म्हणजे यातील 45 जागा लोकप्रतिनिधींचं निधन झाल्याने रिक्त आहेत. तर 20 जागा अपात्रतेमुळे रिक्त झालेल्या आहेत.

संतोष देशमुख यांच्या निधनानंतर त्यांचे बंधू धनंजय देशमुख सक्रिय असून सरपंच पदासाठी कुटुंबातील एखाद्या सदस्याला किंवा पत्नीला उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे मात्र मस्सा जोगं ग्रामस्थ ही निवडणूक बिनविरोध करून संतोष देशमुख यांना आदरांजली वाहणार की विरोधात उभा राहणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!