भोंदूबाबा अशोक खरातचा एन्काऊंटर होणार? महिला नेत्यांने तारीख सांगून बॉम्ब फोडला.


नाशिक: भोंदूबाबा अशोक खरातचे कारनामे समोर आल्यानंतरही अनेक धक्कादायक खुलासे यात समोर येत आहेत.अनेक राजकीय नेत्यांचे खरातसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या प्रकरणात आता भोंदूबाबा अशोक खरातचा एन्काऊंटर होणार असल्याचा दावा महिला नेत्याने केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

अशोक खरात प्रकरणावर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी असे म्हटले आहे की, खरात प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षांचा तीनच दिवसात राजीनामा झाला. परंतु आता सुनेत्रा पवारांनी रूपाली चाकणकरांची पक्षातून हकालपट्टी करणे गरजेचे आहे. अशोक खरातला आता संपवण्याचा डाव होऊ शकतो. कारण अनेक मंत्री राजकारणी यांचे संबंध त्याच्याशी आहेत. ते उघड होऊ नये, यासाठी त्याचा एन्काऊंटर 24 तारखेला होऊ शकतो, अशी शंका काही पीडित व्यक्तींना आहे. त्याच्या एन्काऊंटर डाव मुख्यमंत्र्यांनी उधळून लावावा असे त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे.

अशोक खरातने शेकडो महिलांचं लैंगिक शोषण केल्याचे समोर आलं आहे. महिलांच्या लैंगिक शोषणाचे शेकडो व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागले आहेत. नाशिकच्या भोंदूबाबाचा कारनामा त्याच्या ऑफिसबॉयने उघडकीस आणल्यानंतर पोलिसांनी अशोक खरातवर कारवाईचा बडगा उचलला आहे.

दरम्यान अशोक खरात प्रकरणामुळे रुपाली चाकणकर यांनी राज्य आयोगाच्या महिला अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. राजीनामा देण्याआधी रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे रुपाली चाकणकरांनी राजीनामा सोपवला. आता चाकणकर यांना सहआरोपी करून अटकेची मागणी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!