खरात प्रकरणात आयएएस अधिकाऱ्यांचे कनेक्शन; अटकेआधी 3 अधिकाऱ्यांसोबत गुप्त बैठक, कारवाई होणार?

पुणे : कथित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरातच्या कारनाम्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. एका महिलेने केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर खरातला अटक करण्यात आली आहे.याप्रकरणात राजकीय नेत्यांचे खरात यांच्यासह संबध असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आता IAS अधिका-यांचंही कनेक्शन समोर आले आहे.

कॅप्टन अशोक खरातला अटक करण्यापूर्वी तीन दिवस आधी राज्यातील तीन बड्या अधिकाऱ्यांची आणि खरातची बैठक झाली होती. शिर्डीतील एका नामांकित हॉटेलमध्ये या झालेल्या गुप्त बैठकीत भेटणारे महाराष्ट्रातील 3 बडे IAS अधिकारी कोण? याचा तपास आता केला जात आहे. एसआयटी चौकशी ते समोर येणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशोक खरातवर महिलांच्या लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप असून, त्याच्या ताब्यातून शंभरहून अधिक व्हिडिओ आढळल्याची माहिती समोर आली आहे.
तसेच ‘तांत्रिक विधी’ आणि दैवी शक्तींच्या नावाखाली महिलांचा विश्वास संपादन करून त्यांचे शोषण केल्याचा संशय तपासात व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने SIT स्थापन केली असून, आयपीएस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे.

एका व्यक्तीने तीन IAS अधिकाऱ्यांची बैठक घडवून आणल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील ते तीन IAS अधिकारी कोण? SIT चौकशीत समोर येणार का? याकडे सर्वांच लक्ष लागले आहे.