रूपाली चाकणकरानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोण? राष्ट्रवादीच्या ‘या’ दोन नावांची चर्चा..


पुणे : शेकडो महिलांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेला नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातमुळे रूपाली चाकणकर या चांगल्याच अडचणीत आल्या आहेत. त्याच्यासोबत व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडिओमुळे चाकणकरांना राजीनामा द्यायची वेळ आली. त्यानंतर आता त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे.

राष्ट्रवादी पक्षाच्या वाट्याला महिला आयोगाचे अध्यक्ष पद असल्याने राष्ट्रवादीतील दोन महिलांचा या नावासाठी चर्चा सुरु आहे.वैशाली नागवडे आणि प्रतिशा शिंदे या दोघींचा या पदासाठी चर्चा सुरु असल्याच समोर आलं आहे. वैशाली नागवडे या पुण्याच्या आहेत तर प्रतिशा शिंदे या उत्तर महाराष्ट्रातील आहेत. चाकणकर यांच्यानंतर आता यामध्ये कोणाची वर्णी लागणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

अशोक खरात याच्या अटकेनंतर त्याचे अनेक कारनामे उघडकीस येत आहेत. अशोक खरात याची पाद्यपुजा करतानाचा आणि त्याच्या डोक्यावर छत्री धरल्याचे रुपाली चाकणकर यांचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यानंतर अनेकांनी पत्रकार परिषदा घेऊन त्यांच्यावर टीका केल्यानंतर काल शुक्रवारी रात्री महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला आहे.यानंतर आता पुढच्या अध्यक्ष कोण होणार याची राष्ट्रवादी पक्षात चर्चा सुरु आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!