Reels पाहणाऱ्यांसाठी खुशखबर! इंस्टाग्रामचं नवं फीचर; कंट्रोल आता एका टॅपमध्ये…


मुंबई : लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम आपल्या वापरकर्त्यांचा अनुभव अधिक चांगला करण्यासाठी सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असते. आता कंपनीने रील्स पाहणाऱ्या यूजर्ससाठी एक अत्यंत उपयुक्त आणि नवा बदल सादर केला आहे.

आतापर्यंत व्हिडिओ थांबवण्यासाठी स्क्रीनवर सतत बोट दाबून ठेवावे लागत होते. मात्र, या कटकटीतून आता कायमची सुटका होणार असून, रील्स पाहण्याची पद्धत अधिक सोपी आणि सोयीस्कर झाली आहे.

पूर्वीच्या पद्धतीनुसार, कोणताही व्हिडिओ मध्येच थांबवण्यासाठी स्क्रीनवर सतत स्पर्श करून ठेवावा लागत होता. या प्रक्रियेमुळे लांबलचक कॅप्शन वाचताना किंवा एखाद्या विशिष्ट दृश्यावर लक्ष केंद्रित करताना वापरकर्त्यांना मोठी गैरसोय होत होती.

मात्र, आता इंस्टाग्रामने सादर केलेल्या ‘टॅप टू पॉज’ या नव्या सुविधेमुळे केवळ एकदाच स्क्रीनवर टॅप केल्यास व्हिडिओ त्या ठिकाणी थांबेल आणि पुन्हा टॅप केल्यास तो सुरू होईल.

या फीचरमुळे कोणताही महत्त्वाचा भाग चुकणार नाही आणि वापरकर्त्यांना आपल्या सोयीनुसार कंटेंट पाहण्याचे अधिक स्वातंत्र्य मिळेल. तसेच, रील थांबवल्यानंतर स्क्रीनवर म्यूट (आवाज बंद) करण्याचा पर्यायही उपलब्ध होणार असून, अचानक येणाऱ्या आवाजावर नियंत्रण ठेवणे अधिक सोपे होईल.

सुरुवातीच्या टप्प्यात या सुविधेची चाचणी काही निवडक खात्यांवर करण्यात आली होती, ज्यामध्ये काही वापरकर्त्यांना केवळ आवाज बंद (म्यूट) करण्याचा पर्याय दिसत होता. आता मात्र हे अद्यतन Android आणि iOS या दोन्ही प्रणालींवर टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिले जात आहे. भौगोलिक प्रदेश आणि वापरकर्त्यांच्या खात्यानुसार ही सुविधा सर्वांना एकाच वेळी न मिळता हळूहळू उपलब्ध होईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या नव्या सुविधेसोबतच इंस्टाग्रामने अलीकडच्या काळात एआय तंत्रज्ञानावर आधारित अनेक आकर्षक बदल रील्समध्ये समाविष्ट केले आहेत.

व्हिडिओ तयार करणाऱ्या क्रिएटर्ससाठी आता विविध प्रकारचे मजेदार आवाजांचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये चिपमंक, डेमन, एलियन आणि रोबोट यांसारख्या अनोख्या व्हॉइस इफेक्ट्सचा समावेश आहे. या अत्याधुनिक साधनांचा वापर करून क्रिएटर्स आपले व्हिडिओ अधिक रंजक, सर्जनशील आणि प्रेक्षणीय बनवू शकतात.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!