पुणे हादरले! सैराट स्टाईलने तरुणाचा गेम, तो तिला भेटायला गेला अन्…शहरात खळबळ

पुणे : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत

प्रेमसंबंधाच्या पार्श्वभूमीवर एका तरुणाची अत्यंत निर्दयी पद्धतीने हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. कोथरूड सारख्या गजबजलेल्या परिसरात भररस्त्यात झालेल्या या थरारामुळे संपूर्ण पुणे शहर हादरून गेले आहे.
प्रेयसीला भेटायला गेलेल्या या तरुणाचा असा काही करुण अंत होईल, याची पुसटशी कल्पनाही कोणाला नव्हती. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना बेड्या ठोकल्या असून, या हत्याकांडात तब्बल 10 जणांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे.

नागेश जाधव (रा. गोखले नगर, वडारवाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, नागेश हा गोखले नगर वडारवाडी परिसरात राहणारा होता. नागेशचे एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती पुढे आली आहे. संबंधित मुलीने मोबाईलवरून संपर्क साधत नागेशला भेटण्यासाठी बोलावल्याचे सांगितले जात आहे.
तिच्या बोलावण्यावरून तो कोथरूड परिसरात गेला. मात्र त्याला भेटायला गेल्यानंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली. मुलीच्या कुटुंबीयांनी नागेशला घराच्या टेरेसवर नेल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याच्यावर लाकडी दांडक्यांनी तसेच लाथाबुक्क्यांनी जोरदार मारहाण करण्यात आली.
या वेळी नागेशच्या अंगावर कपडेही नव्हते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. झालेल्या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ माजली असून नागेशच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त करत सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.
या प्रकरणी कोथरूड पोलिस स्टेशन येथे एकूण 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आतापर्यंत सहा आरोपींना अटक केली असून उर्वरित चार जणांचा शोध सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये पाच महिलांचा आणि एका पुरुषाचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.